

मनवेलपाडा : पावसाळ्यात तलाव, नदी, नाले, ओढे, खदानी अशा ठिकाणी पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्ती बुडून मरण पावतात. अशा बुडलेल्या व्यक्तींना शोधण्यासाठी सुरक्षा यंत्रणाना कसरत करावी लागते. पाणबुड्या, तैराकी, स्थानिकांची मदत घायवी लागते. अनेक प्रयत्नानंतर अशा व्यक्तींना बाहेर काढण्यात बराच वेळ लागतो. पाण्यात बुडाल्यानंतर त्या व्यक्तीचा लगेच शोध घ्यावा या दृष्टीने वसई विरार अग्निशमन दलाकडे आधुनिक यंत्रणा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे बचाव कार्य किंवा मदत कार्य करण्यासाठी आता खूप अवधी लागणार नाही.
वसई विरार शहरात अनेक ठिकाणी वारंवार व्यक्ती पाण्यात बुडण्याच्या घटना समोर येत आहेत. वसई विरार मध्ये तलाव विहिरी नाले असे अनेक ठिकाणी आहेत. विशेषतः पावसाळ्यात या तलाव किंवा खदानी मध्ये तरुण मंडळी होण्यासाठी पाण्यात हौशीने जातात. परंतु कधी कधी पाण्याचा अंदाज न आल्या कारणाने ते त्या पाण्यात बुडतात. यापूर्वी अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. बहुतांश वेळा बुडलेल्या व्यक्तीची माहिती उशिरा अग्निशमन दलास समजते व उशीर झाल्याकारणाने मृतदेह शोधणे अवघड होते.
पाण्यात बुडालेल्या व्यक्तींचा शोध जलद गतीने लागावा व त्यांची माहिती उपलब्ध व्हावी म्हणून महानगरपालिकेने अग्निशमन दलाला सोनार स्कॅनर सर्च कॅमेरा ही यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. या यंत्रामुळे कितीही खोलवर गेलेली व्यक्ती या यंत्राच्या सहाय्याने शोधणे सोपे होणार आहे. बुडलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी महानगरपालिकेने अग्निशमन विभागासाठी सात आधुनिक स्वरूपाची शोध यंत्रे घेतली आहेत. यामुळे पाण्यात बुडलेली व्यक्ती कोणत्या ठिकाणी आहे, हे लवकर समजेल व त्याला बाहेर काढण्यासाठी या यंत्राची फार मदत होणार आहे.
एखादी व्यक्ती पाण्यात बुडाली तर हे यंत्र तलाव किंवा नदी नाले अशा ठिकाणीच्या किनारी किंवा व्यक्ती बुडाली असेल त्या दिशेला ठेवले जाते. त्यानंतर हे यंत्र सुरू केले जाते या यंत्रात असलेल्या कॅमेर्याने बुडालेली व्यक्ती अचूक टिपली जाते या यंत्रानेला सोनार स्कॅनर सर्च कॅमेरा असे नाव आहे हे यंत्र बुडालेल्या व मृत पावलेल्या व्यक्तींचा अचूक वेध घेऊन ती कुठे आहे. याचा शोध घेते त्यामुळे अग्निशमन दलाला तारेवरची कसरत करावी लागणार नाही. तसेच या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी वेळ ही कमी लागणार आहे.