National flag tribute : भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजाला दुर्गमित्रांकडून मानवंदना

दुर्गमित्र देणार पालघरमधील गडकोट किल्ल्यांवर सलग19वी मानवंदना
National flag tribute
भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजाला दुर्गमित्रांकडून मानवंदनाpudhari photo
Published on
Updated on

खानिवडे : एकशे अठरा वर्षांचा इतिहास ठरलेल्या भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजाला दुर्गमित्र व इतिहास प्रेमी जिल्ह्यातील गडकोट किल्ल्यावर सलग 19वी मानवंदना देणार आहेत. वसईच्या किल्ल्यात येत्या 24 ऑगस्टला ह्या मानवंदनेला सुरवात होणार असून पालघर जिल्ह्यातील विविध ऐतिहासिक स्थळांवर 24 सप्टेंबर पर्यंत मानवंदना देण्यात येणार आहे.

सन 2007 सालापासून किल्ले वसई मोहिम परिवार अंतर्गत पहिल्या राष्ट्रध्वजाच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी मानवंदना व स्मरण मोहिम आयोजित करण्यात येते. यंदा या ध्वजास 118 वर्ष पूर्ण होत असून दूर्गमित्रांचे हे 19 वे वर्षे आहे.गडकोटांवर मानवंदना देणारा हा देशातील एकमेव उपक्रम म्हणून ओळखला जातो. किल्ले वसई मोहिम परिवार अंतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदाही दिनांक 24 ऑगस्ट ते 24 सप्टेंबर 2025 या कालावधीत भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजाचा जयजय दर रविवारी जिल्ह्यातील विविध गडकोटांवर होणार आहे.

जगातील सर्व राष्ट्रांना आपले स्वतंत्र ध्वज आहेत. त्या ध्वजांना तेथील जनमानसात स्वतंत्र मान आणि आदर आहे. भारतीयांनी ध्वज ही कल्पना राबविली तेव्हा भारताचा तिरंगा काही एका दिवसात तयार झाला नाही. त्याला एका शतकापूर्वी निर्माण झालेल्या संकल्पनाची पार्श्वभूमी आहे. 22 ऑगस्ट 1907 रोजी जर्मनमधील स्टुटगार्ड या शहरात जागतिक समाजवाद्यांची परिषद भरली होती. त्या ठिकाणी भारताच्या प्रतिनिधी म्हणून असलेल्या मादाम कामांनी युनियन जॅक न घेता आपल्या कल्पनेने साकार केलेला स्वतंत्र असा ध्वज भारताचा म्हणून सादर केला.

मादाम कामा यांनी सन 1907 मध्ये जर्मनीतील स्टुटगार्ड शहरात भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचा आद्य राष्ट्रध्वज फडकवला. ऑगस्ट 1937 मध्ये सदर ध्वजाचे भारतात आगमन झाले. पुण्यात पोहोचल्यावर ध्वजाची मिरवणूक काढण्यात आली. केसरीवाडा ते पुणे रेल्वे स्थानक या मार्गावर निघालेल्या या मिरवणूकीत स्वातंत्र्यवीर सावरकर सहभागी झाले होते. ध्वजाच्या आरेखनात स्वा. सावरकरांचे योगदान होते.

हिंदू मुस्लिमांमध्ये एकोपा साधण्याच्या हेतूने सावरकरांनी ध्वजावर अनुक्रमे सूर्य आणि चंद्र या चिन्हांना स्थान दिले होते यावरून त्यांची दूरदृष्टी दिसून यावी. हा ध्वज पुण्यात केसरीवाड्यात ठेवण्यात आला आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या व विविध ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार असणारा ध्वज भारताचा पहिला राष्ट्रध्वज म्हणून संबोधतो. या प्रदीर्घ वाटचालीच्या काळात चक्क 34 ध्वज उदयास येऊन गेले आणि तिरंगा हा 35 वा ध्वज आपणास मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news