

पालघर : पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील अवैध मासेमारी रोखण्याच्या कामात ड्रोनचा वापर सुरु झाल्यापासून अवैध मासेमारीला रोख लावण्यात मत्स्यव्यवसाय विभागाला यश आले आहे. मत्स्यव्यवसाय विभागाकडून पालघर जिल्ह्यात तीन ठिकाणी ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. दिवसातुन तीन वेळा ड्रोन समुद्रात जाण्यासाठी उड्डाण भरत आहेत.
समुद्र किनार्या पासून बारा नॉटिकल मेल अंतरा पर्यंत जाऊन समुद्रातील हालचालीची माहिती ड्रोनच्या माध्यमातून मत्स्यव्यवसाय विभागाला उपलब्ध करून दिली जात आहे. अवैध मासेमारी रोखण्यासाठी ड्रोनचा वापर फायदेशीर ठरत असल्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे म्हणणे आहे.
पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील डहाणू तालुक्यातील बोर्डी, पालघर तालुक्यातील शिरगांव आणि वसई तालुक्यातील रानगाव येथे ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. ड्रोन समुद्र किनार्या पासून बारा नॉटिकल मेल अंतरा पर्यंत जाऊन समुद्रातील हालचालीची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाला उपलब्ध करून दिली जातं आहे. 9 जानेवारी 2025 पासून स्चेनेल ड्रोन टेकनॉलॉजी कंपनी मार्फत काम सुरु आहे. दिवसातुन तीन वेळा ड्रोन समुद्रात जाण्यासाठी उड्डाण भरत आहेत.
93 बोटींवर कारवाई
ड्रोनच्या माध्यमातून केलेल्या निगराणीत जाळे ओढण्यासाठी बूम लावलेल्या बोटी आढळून आल्या होत्या, परंतु बूम लावणे नियम बाह्य नसल्याने कारवाई करण्यात आली नाही. नंबर आणि कलर कोड नसलेल्या सातपाटी बंदरातील 68 तर डहाणू तालुक्यातील 25 बोटिंवर कारवाई करण्यात आली आहे. जुन महिन्यात मासेमारी बंदी कालावधी सुरु झाल्यानंतर मासेमारी करून परतणार्या बोटिंवर दांडात्मक कारवाई करण्यात आली आहे.