

सफाळे : कोरोना महामारी दरम्यान बंद करण्यात आलेल्या डहाणू लोकलच्या दोन फेऱ्या म्हणजे विरार येथून पहाटे ५:०० ची डहाणू लोकल तर डहाणू येथून सकाळी ७:०५ ची विरार लोकल. ही लोकल पुन्हा सुरूप्रयत्नाला अखेर यश येऊन येत्या दसऱ्याच्या शुभदिनी दि. १२ ऑक्टोबरपासून खालीलप्रमाणे दोन अप आणि दोन डाऊन डहाणू लोकलच्या फेऱ्या सुरू होत आहेत.
ही ७:०५ ची लोकल सुरू व्हावी म्हणून वैतरणा ते डहाणू दरम्यानच्या सर्व स्टेशनच्या प्रवाशांच्या सह्यांची मोहीम सुद्धा संस्थेच्या माध्यमातून आखून जवळजवळ ९०० प्रवाशांच्या सह्यांचे पत्र पच्छिम रेल्वे कडे मांडण्यात आले होते व पाठपुरावा सुरू होता. तसेच पालघरचे विद्यमान खासदार डॉ. हेमंत सवरा यांनीही रेल्वे मंत्रालयात प्रयत्न केले होते.
सकाळी सौराष्ट्र एक्सप्रेसची वेळ बदलून एक तास उशिरा केले होते, त्यामुळे शिक्षक वर्गांना खूप त्रासदायक होताना दिसत होते. त्यामुळे सौराष्ट्र एक्सप्रेसच्या वेळवर एक डहाणू साठी विरार येथून ९:३० च्या लोकलची मागणी संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली होती ती रेल्वेने मान्य केल्याबद्दल संस्थेने पश्चिम रेल्वे चे धन्यवाद मानले आहेत.
७:०५ ची बंद करण्यात आलेल्या लोकलमुळे प्रवाशांना गेले साडेतीन वर्षे खूप हालअपेष्टा सहन करत प्रवास करावा लागत होता आणि ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था अत्यंत कसोशीने कामाला लागली होती.