Dahanu Local Train: डहाणू लोकलच्या अपुऱ्या फेऱ्यांमुळे प्रवासी त्रस्त; वाढत्या गर्दीवर उपायांची मागणी

सफाळे-वैतरणा प्रवाशांना चढणेही कठीण; 1 एप्रिलपासून फेऱ्या वाढवून 15 डब्यांची लोकल सुरू करण्याची मागणी
Dahanu Local Train
Dahanu Local TrainPudhari
Published on
Updated on

सफाळे : पश्चिम रेल्वे मार्गावरील डहाणू विभागात डहाणू लोकल सुरू होऊन तब्बल 13 वर्षे पूर्ण झाली असली तरी या कालावधीत वैतरणा ते डहाणू दरम्यान प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाढत्या गर्दीमुळे सध्या धावणाऱ्या लोकलच्या फेऱ्या अपुऱ्या पडत असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

Dahanu Local Train
Padma Shri Bhiklya Dhinda: पद्मश्री तारपा वादक भिकल्या धिंडा आर्थिक अडचणीत; शासनाने मदत करावी – आमदार तांबे

मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने सफाळे व वैतरणा येथील प्रवाशांना गाडीत चढणेही कठीण होत आहे. त्यामुळे डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरू लागली आहे. सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींमार्फत रेल्वेमंत्री, रेल्वे बोर्ड तसेच रेल्वे अधिकाऱ्यांकडे निवेदने देऊन पाठपुरावा केला जात असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात लोकलच्या फेऱ्या वाढविण्याबाबत कोणतीही ठोस हालचाल दिसून येत नाही. त्यामुळे प्रवाशांच्या अपेक्षा अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत.

Dahanu Local Train
Palghar Jal Jeevan Mission: पालघरमध्ये जलजीवन मिशनवर प्रश्नचिन्ह; थकीत बिलांसाठी ठेकेदारांचे साखळी उपोषण

दरम्यान, या प्रश्नावर विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे. प्रवाशांच्या समस्या जाणून घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेणे, निवेदने देणे तसेच संसद व विधानसभेत हा मुद्दा प्रभावीपणे मांडणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Dahanu Local Train
Vasai News | महिला दिनी वसईत मातृत्वाचे क्रूर दर्शन : निरागस बालिकेला रस्त्यात टाकून आई पसार

1 एप्रिलपासून उपनगरीय लोकलचे नवीन वेळापत्रक लागू होणार असल्याने या वेळापत्रकात डहाणू लोकलच्या फेऱ्या वाढविणे तसेच 15 डब्यांची लोकल सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. आता या मागणीबाबत सत्ताधारी व विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधी प्रवाशांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात कितपत यशस्वी ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news