Dabhosa Skywalk: जव्हारमधील कोटींच्या स्कायवॉकला मुर्हूत कधी?

दाभोसा धबधबा बंद झाल्यावर स्काय वॉक सुरू होणार का ? पालकमंत्र्यांची प्रतिक्षा की तांत्रिक अडचणी
Dabhosa Skywalk
Dabhosa SkywalkPudhari
Published on
Updated on

हनिफ शेख

पालघर: जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी या भागातील पर्यटन स्थळे अधिक समृद्ध व्हावी यासाठी मोठा गाजावाजा करून जव्हार तालुक्यातील दाभोसा या ठिकाणी दोन कोटी रुपये खर्च करून काचेचा स्काय वॉक बांधण्यात आला आहे.

या स्कायवाकची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली आजही समाज माध्यमातून याचे चित्रीकरण प्रसिद्ध होत असते अतिशय आकर्षक दिसणाऱ्या या स्काय वाघ वर उभे राहून समोरून अतिशय उंचीवरून कोसळणाऱ्या दाभोसा धबधब्याचे मनमोहक चित्र दिसणार आहे यामुळे राज्यभरातून हा धबधबा बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ही मोठी पर्वणी आहे.

Dabhosa Skywalk
Kisan Kathore: नऊ वर्षे साथ दिली; यावेळी संयम अपेक्षित होता-आ. कथोरे

याबाबत जिल्हाधिकारी पालघर आणि सर्व प्रशासकीय यंत्रणांचे अभिनंदन देखील होत आहे . मात्र स्कायवाॅक उभारून दोन महिन्यांचा कालावधी होत आला तरीही अद्याप पर्यंत तो पर्यटकांसाठी खुला न केल्याने आश्चर्य व्यक्त होत असून तयार असलेला स्काय वॉक का खुला केला जात नाही ? याबाबत आता अनेक प्रश्न विचारले जात असून प्रशासन काही तांत्रिक बाबी पूर्ण करावयाच्या असल्याचे सांगत आहेत तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या स्कायवॉक च्या उद्घाटनासाठी पालकमंत्र्यांची वाट पाहिली जात आहे काय ? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

पालघर जिल्ह्याला बारा महिने पर्यटन म्हणून मोठा समुद्रकिनारा लाभला आहे मात्र पावसाळी पर्यटनासाठी देखील जव्हार मोखाडा विक्रमगड या ग्रामीण भागातील अनेक धबधबे आकर्षित करत असतात यातच संपूर्ण राज्यात नाही तर देशाला माहिती असलेला दाभोसा धबधबा हे जवाहर येथील पर्यटनाचे सर्वात मोठे आकर्षण आहे.

आजवर या ठिकाणी पर्यटनाच्या नावाने कोट्य दीर रुपये खर्च झाले मात्र त्याचा किती फायदा या स्थळांच्या विकासासाठी झाला हा संशोधनाचा भाग आहे मात्र सध्या जिल्हाधिकारी डॉ इंदूराणी जाखड यांच्या कल्पनेतून याठिकाणी नुकताच तब्बल २ कोटी रुपये खर्चून स्कायवॉक बांधण्यात आला.

फाउंडेशन पासून 45 फूट दरीकडे त्यातील 18 फूट लांबीचा भाग हा संपूर्ण दरीत राहणार आहे. जिथून समोरच कोसळणारा धबधबा बघता येणार आहे. अशी स्कायवॉक ची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामुळे जव्हार मधील या पर्यटनस्थळांच्या यादीत हा स्कायवॉक अव्वल ठरणारा आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडून याची पाहणी १२ जून रोजी करण्यात आली.

Dabhosa Skywalk
Kirit Somaiya: मुंब्र्यामध्ये मतदार याद्यांत ४० हजार बांगलादेशींची नावे घुसडण्याचे कारस्थान; किरीट सोमय्या यांचा गौप्यस्फोट

यामुळे यानंतर काही आठवड्याभरात हा स्कायवॉक खुला होईल अशी अपेक्षा होती त्यानंतर या जागेचा मोठ्या प्रमाणात गाजावाजा देखील झाला कित्येक लोक यास काय वाटचा व्हिडिओ बघून देखील त्या ठिकाणी आले मात्र आज पर्यंत हाच काय वाघ पर्यटकांसाठी खुला झालेला नसल्याने संताप व्यक्त होत आहे याबाबत अधिक माहिती घेतली असता यास काय वाघच्या देखरेखी साठी एक वेगळे टेंडर काढले जाणार आहे.

त्यासाठी किमान आठवडाभराचा कालावधी जाणार असून त्यानंतर मेंटेनेस ठेवण्यासाठी आणि या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांच्या संपूर्ण काळजीसाठी हे टेंडर असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.

पर्यटकांकडून आकारार तिकीट ?

मुळात दाभोसा येथील हा स्कायवॉक सर्वासाठी खुला तर होईल मात्र तो मोफत असेल अशी लोकांची धारणा आहे मात्र याबाबत याचा पुढील खर्च भागविण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक पर्यटकाला याची अनुभूती घेण्यासाठी किमान १०० रुपयांचे तिकीट ठेवले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

याशिवाय त्याठिकाणी एक कर्मचारी एका वेळी फक्त २५ पर्यटक जाऊ शकतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय एका पर्यटकांने तीन ते चार मिनिटे की अजून किती वेळ त्याठिकाणी थांबावे यावर देखील नियमावली बनणार आपले चप्पल बूट घालून यावर जाता येणार नसून पायमोजे घालून यावर जावे लागणार आहे यासाठी त्याठिकाणी चेंगिंग रूम देखील बांधली गेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news