बोईसरमध्ये खंडित वीजपुरवठ्याने व्यावसायिक त्रस्त

Palghar News | ऐन दिवाळीच्या सणात व्यावसायिकांवर संक्रांत येण्याची वेळ
Palghar News |
बोईसरमध्ये विद्युत पुरवठा खंडित होण्याने विविध व्यावसायिक वीजग्राहक त्रस्त झाले आहेत. file photo
Published on
Updated on

बोईसर : संदीप जाधव बोईसर पूर्व भागातील बेटेगाव, मान, वारंगडे, गुंदले, लालोंडे, नागझरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून महावितरण विद्युत पुरवठ्यात अचानक बिघाड होत असल्याने सकाळपासून संध्याकाळपर्यंत अचानक कधीही वीज गायब होत आहे. त्यामुळे व्यावसायिकांची तारांबळ उडत आहे.

व्यावसायिकांमधून संताप व्यक्त 

सततच्या विद्युत पुरवठा खंडित होण्याने विविध व्यावसायिक वीजग्राहक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे ऐन दिवाळीच्या सणात विद्युत पुरवठा खंडित होत आहे, व्यवसाय बंद पडत असल्यामुळे व्यावसायिकांवर संक्रांत येण्याची वेळ आली आहे. त्यामुळे व्यावसायिक संताप व्यक्त करीत आहेत. बेटेगाव, टाटा हाउसिंग, वारांगडे आणि गुंदले या चार वीज उपकेंद्रातून साधारण ८० ते ९० आदी गावांतील शेतीपंपासह घरगुती उपकरण व विविध व्यवसायासाठी वीजपुरवठा केला जातो.

व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान 

या परिसरात मोठ्या प्रमाणात विविध अनेक छोट्या मोठ्या कंपन्या, स्टोन क्रशर व्यवसाय, विविध प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत. त्या सर्व उद्योग व्यवसायांना शेतीपेक्षा जादा दराने वीजपुरवठा केला जातो. गेल्या आठवडाभरापासून महावितरणकडून वीज पुरवठा अचानक खंडित होत आहे. त्यामुळे प्रामुख्याने स्टोन क्रशर व्यवसायिक अडचणीत आले आहेत. सततचा वीज पुरवठा खंडित होत असल्याने अनेक व्यवसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

गेल्या दोन तीन दिवसांपासून संबंधित गावांच्या व्यवसायासाठी असणारी वीज सकाळ, दुपार, संध्याकाळच्या वेळेस कधीही गायब होऊन कधीही येत आहे. या कालावधीत विविध व्यावसायिकांचे काम वेगाने सुरू असते. मात्र, वीज गेल्यानंतर अनेक कंपन्यांना तसेच व्यावसायिकांना लाखो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी

ऐन दिवाळीच्या सणामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून सतत विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याने आमचे लाखो रुपयांचे नुकसान होत असून विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे स्टोन क्रेशर मध्ये अनेकदा मोठाले दगड अडकून पडतात. अशावेळी दिवसभर क्रशर मशिन बंद ठेवून काम करावे लागते. शिवाय दिवाळीच्या सणांमध्ये कामगारांचे बोनस, कामगारांचे पगार देणे महत्त्वाचे आहे. मात्र व्यवसायच बंद पडत असल्याने व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. महावितरणच्या संबंधित भागातील अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष देऊन सदरचा विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याकडे लक्ष द्यायला हवे. असे एका स्टोन क्रेशर उद्योजकाने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले आहे.

Palghar News |
Palghar News: पालघर जिल्ह्यात दगडी कोळशास वाढती मागणी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news