Boisar burglary case : घरफोडीच्या तीन गुन्ह्यांचा पर्दाफाश

२ आरोपी ताब्यात; बोईसर पोलिसांची कारवाई
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

बोईसर : बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीच्या मालिकेचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत बोईसर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या कारवाईत एका १८ वर्षीय आरोपीसह एका विधिसंघर्षग्रस्त अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या चौकशीत बोईसर व केळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून चोरीतील मुद्देमालासह गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कुटी जप्त करण्यात आली आहे.

९ जुलै रोजी बोईसर येथील प्रिन्स बार अँड रेस्टॉरंटचे शटरचे कुलूप तोडून रोख रक्कम व इतर ऐवजाची चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढत त्यांना ताब्यात घेतले.

Crime News
Chandrapur Crime : चंद्रपूर एलसीबीची मोठी कारवाई; आंतरराज्यीय सराईत घरफोड्या करणारा आरोपी जेरबंद, ९ गुन्ह्यांची उकल

पोलीस चौकशीत आरोपींनी बोईसर व केळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी दोन घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींकडून ३५ हजार ९४५ रुपयांचा चोरीतील मुद्देमाल तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कुटी जप्त केली आहे.

Crime News
Beed News : आंतरजिल्हा दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; २९ दुचाकी केल्या जप्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news