Jawhar Nagar Parishad election results : जव्हारमध्ये भाजपाकडून विरोधकांचा टप्प्यात कार्यक्रम

मुस्लीम मतांची विभागणी, कार्यकर्त्यांचे जाळे अन्‌‍ भाजप विजयी
Jawhar Nagar Parishad election results
जव्हारमध्ये भाजपाकडून विरोधकांचा टप्प्यात कार्यक्रमpudhari photo
Published on
Updated on

पालघर : जव्हार नगर परिषदेमध्ये इतिहासात पहिल्यांदाच भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवली आणि ती जिंकली सुद्धा. यामुळे जिल्ह्यातील इतर निवडणुका बरोबरच जव्हारची निवडणूक ही सर्वाहून वेगळी ठरली कारण की आजवर याआधी मध्ये जव्हार मध्ये एकसंध असलेली शिवसेना, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनीच सत्ता गाजवली आहे. कारण की जव्हार शहरात भाजपकडे कार्यकर्ते सोडा सर्व जागा लढविण्यासाठी उमेदवार मिळणे ही आजवर कठीण होते.

मात्र यंदा केंद्रात राज्यात जिल्ह्यात आणि लोकसभा विधानसभा क्षेत्रातही भाजपा असल्याचा फायदा जव्हार शहर भाजपने चांगलाच उचलला आणि जव्हार जिंकण्यासाठी इतर पक्षांप्रमाणे फक्त निवडणूक लागल्यानंतर नाही तर गेल्या दोन ते तीन वर्षापासून कामाला सुरुवात भाजपाने केली होती.

Jawhar Nagar Parishad election results
Talasari highway accidents : तलासरीत उपाययोजनांअभावी रस्ते अपघातात वाढ

जव्हार भागातील सर्वात नाजूक विषय आहे तो काम धंद्यांचा या ठिकाणी कोणतीही इंडस्ट्रीज नाही, शेती म्हणावी तर तीही केवळ खाण्यापुरतीच यामुळे या भागात येथील राजकारण हे ठेकेदारीवरच अवलंबून असते याचाच फायदा भाजपने घेतला आणि अनेक कार्यकर्त्यांना छोटी छोटी कामे देऊन उभे केले आणि कार्यकर्त्यांचे जाळे बनविले. जो कार्यकर्ता विरोधी पक्षात होता. त्याला कामांची आमिष देऊन आपलेसे केले. यातूनच विरोधक जव्हार शहर आपला बालेकिल्ला ह्या आशेवर गाफील राहिले.

भाजप मात्र आपल्या मजबुती करण्याचे काम अधिक ताकतीने करत राहिला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जव्हार शहरात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय होती आणि सेक्युलर विचारधारा म्हणून हे मतदार भाजपला साथ देणार नाहीत अशी अटकळ बांधली जात होती. मात्र भाजपने एका प्रभागात मुस्लिम उमेदवार दिलाच. मात्र आजवर कोणत्याही पक्षात नसलेल्या अनेक मुस्लिम तरुणांना ठेकेदारीची कामे देऊन पक्षात नाही पण सोबतीला ठेवले हे इतर पक्षांच्या लक्षात आलेच नाही.

एवढेच काय तर स्वबळाचा नारा देत शिवसेना शिंदे गटाला वेगळे लढण्यास भाग पाडले यातूनच मुस्लिम मतांची विभागणी करणे, भाजपला सोपे गेले फक्त विभागणी होईल आणि आपल्याला फायदा होईल याच्या भरवशावर भाजप न राहता जव्हार शहरातील अनेक मुस्लिम मतदार भाजपने फोडण्याची देखील या निवडणूक निकालातून दिसून येत आहे. कारण की तीन हजाराहून अधिक मुस्लिम मतदार असलेल्या जव्हार शहरात मुस्लिम उमेदवाराला फक्त 2200 मते पडतात त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या रश्मीन मणियार यांचे आणि त्यांचे पती रियाज मणियार यांचे देखील जव्हार शहरातील अनेक व्यापारी बांधव मुस्लिम आदिवासी अशा विविध जातीतील अनेक मंडळींची चांगले संबंध तरीही खूप मोठ्या फरकाने त्यांना पराभव पत्करावा लागल्याचे यातून दिसून आले.

Jawhar Nagar Parishad election results
Leopard attack : मुरबाडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

याहूनही सर्वात महत्त्वाचे म्हणजे भाजपाने या निवडणुकीत नियोजन अगदी परफेक्ट केल्याचे दिसून आले. निवडणूक जाहीर होताच प्रचाराचे लागलेले बॅनर प्रचार वाहनांची खूप अगोदरच तयारी नव्या चेहऱ्यांना दिलेली संधी आणि कुठेही हवेत न राहता भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पासून तळागाळातील अनेक भाजप कार्यकर्त्यांना प्रचारात सक्रिय ठेवले. मुख्यमंत्र्यांनी पालघर आणि डहाणू येथे प्रचार सभा घेतल्या जव्हार मध्ये घेतली नाही तरीसुद्धा भाजप कार्यकर्ते हिरमुसून न जाता त्यांनी वातावरण निर्मितीसाठी पालकमंत्री गणेश नाईक यांची एक सभा शेवटच्या दिवशी घेतली.

नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याने उमेदवारावर टीका करण्यास विरोधी पक्षाला वाव भेटला नाही याशिवाय तरुण उमेदवार जास्त असल्याने कोणीही भाजप नेत्यांच्या मर्जी विरोधात वागला नाही ज्या पद्धतीने ज्येष्ठांनी मार्गदर्शन केले. त्याच पद्धतीने एकोप्याने सर्व नगरसेवक लढले याशिवाय विरोधकांच्या क्रॉस वोटिंगच्याही भानगडीत कोणीही पडलं नाही त्यातून जवळपास 1653 मतांनी पूजा उदावंत यांचा विजय झाला आणि तब्बल 14 नगरसेवक भाजपाचे निवडून आले.

जव्हार नगर परिषदेत यंदा तब्बल17 नवीन चेहरे

जव्हार नगरपरिषदेत यंदा नगराध्यक्ष आणि तब्बल 16 नगरसेवक हे पहिल्यांदाच निवडून गेल्याचे चित्र आहे यामुळे भाजपाने निवडून आणलेल्या 14 चेहऱ्यामधील तब्बल 12 नगरसेवक नव्यानेच निवडून आल्याचे दिसून येत आहेत तर शिवसेना शिंदे गटाकडून एक नवीन चेहरा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 2 नवीन चेहरे आणि राष्ट्रवादी (शप)कडून 1 अशा नवीन उमेदवारांना जव्हारकरांनी पसंती देऊन आपला नगरसेवक निवडल्याचे दिसून येत आहे. तर अनुभवी म्हणून कुणाल उदावंत भाजप, पद्मा रजपूत शिवसेना शिंदे गट, कमल कुवरा राष्ट्रवादी अजित पवार गट, स्वप्निल अवसरकर भाजप या चार नगरसेवकांचा यामध्ये समावेश आहे. गेल्या कित्येक वर्षापासून प्रशासकाकडून चालविल जाणाऱ्या या नगर परिषदेत आता लोकांचे प्रतिनिधी म्हणून हे नगरसेवक काम करणार असल्याने जव्हारकरांना यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news