भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या स्थानिक परिवहन सेवेच्या बसमधून प्रवास करताना सुट्या पैशांवरून प्रवासी व वाहश्वमध्ये अनेकदा वाद निर्माण होतात. हा वाद निकाली काढण्यासाठी परिवहन विभागाने प्रवाशांना यूपीआय (यूनिफाईड पेमेंट इंटरफेस) की सेवा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे प्रवासादरम्यान सुट्या पैशावरून वाद होण्याची कटकट कमी होऊन वाहकाला ठेपोमध्ये तिकीटाची रक्कम जमा करताना हिशोचाचा ताळमेळ सतत साधण्याची झंझट कमी होणार असल्याचा दावा विभागाकडून करण्यात आला आहे.
स्थानिक परिवहन सेवेच्या बसमधून प्रवास करताना अनेकदा सुट्या पैशावरून प्रवासी च वाहकामध्ये वाद निर्माण हीत असतात, अशावेळी प्रवाशांना बसमधून उत्तरविले जाते अथवा सुटे जमा झाल्यानंतर संबंधित प्रव शाला विकीट दिले जाते, केंद्र सरकारने बहुतांशी व्यबहार डिजिटल केले असले तरी मिरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेस्तठी मात्र हि सेवा उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. दरम्यान हि सेजा काही परिचहन सेवांसह राज्य महामार्ग परिवहन सेलेतही उपलब्ध करून दिल्यानंतरही मिरा-भाईंदर महापालिकेचा परिवहन विभाग त्यापासून वंचित राहिला होता. यामुळे प्रवाशांना या बसमधून प्रवास करताना तिकिटासाठी रोख रकम मोजावी लागत लागत होती. गर्दीच्यावेळी वाहकाला रोख रकम बाळगून तिकीट देणे अडचणीचे होते. तसेच तिकिटाच्या पैशातून जमा होणारी अचूक रोख रक्कम डेपोमध्ये जमा करताना वाहकाला त्याचा सतत ताळमेळ पालावा लागत होता. त्यातव रक्कम मोजताना चोळ झाल्यास ती पुन्हा पुन्हा मोजावी लागत होती. यात वाहकाचा मोठा वेळ याया जात ऐोता. हि समस्या निकाली काढण्यासाठी परिवहन विभागाने आयुक्त संजय काटकर यांच्या निर्देशानुसार प्रवाशांना रोख रकमेऐवजी डिजिटल पेमेंट म्हणजेच यूपीआयचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमधून दररोज सुमारे १ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यासाती परिवहन सेवेच्या सुमारे ८५ बस दररोज रस्त्यावर धावतात. दररोज हजारो प्रवाशांची ने-आण करणाऱ्या बसचे तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना अचूक रोख रकम बाहकाला द्यावी लागत असून हि रोजची कटकट दूर करण्यासाठी परिवहन विभागाने आयुक्तांच्या निर्देशानुसार प्रवाशांना तिकिटाची अचूक रकम देण्याकरीता यूपीआयचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. विभागाने त्याच्या चाचणीकरीता मागील आठवडयात सुख्यातीला पाय वसेसमधील वाहकांना क्यूआर कोड उपलब्ध करून दिला होता. हि चाचणी यशस्वी झाल्यानंतर सोमवारी इतर ६० बमेसमधील वाहकांना फ्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आला. तर पुढील २ दिवसांत हि सेवा तर्परीत बसममधील वाहकांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. यामुळे सुट्या पैशांवरून होणारा वाद निकाली निघाला असून तिकिटापोटी कमी प्रमाणात रोख रकम जमा होणार आहे.