अज्ञात वाहनाने दोन वर्षीय चिमुकल्याला चिरडले

वाडा शहरातील कांदिवली येथील घटना
A two-year-old boy was crushed by an unknown vehicle
अज्ञात वाहनाने दोन वर्षीय चिमुकल्याला चिरडलेFile Photo
Published on
Updated on

वाडा : वाडा शहराला लागूनच असलेल्या कादिवली येथील एका चिमुकल्याला भरधाव वाहनाने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.17) सायंकाळी 7. 30 च्या सुमारास घडली. गुरुनाथ बाळू वाघ (वय.2) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. या अज्ञात वाहनाचा पोलिसांकडून तपास केला जात असून त्या विरोधात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

A two-year-old boy was crushed by an unknown vehicle
नाशिक : येवला येथील चिमुरड्याला चिरडणारा फरार वाहनचालक ताब्यात

गुरुनाथ हा कांदिवली येथील तो रहिवासी होता. भरधाव जात असलेल्या अज्ञात वाहनाने संध्याकाळी 7.30 च्या सुमारास या चिमुकल्याला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. काळया रंगाची चारचाकी गाडी असल्याचा काही स्थानिकांनी संशय व्यक्त केला असून अपघाताच्या नंतर हा वाहनचालक फरार झाला आहे. या घटनेचा वाडा पोलीस तपास करीत असून पोलिसांनी या वाहन चालकाच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी केली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news