नागझरीच्या दगड खाणीत उंचावरून पडून ठेकेदाराचा मृत्यू

ठेकेदार हे नागझरी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य होते
A contractor died after falling from a height in a stone quarry in Nagzhari
नागझरीच्या दगड खाणीत उंचावरून पडून ठेकेदाराचा मृत्यू File Photo
Published on
Updated on

बोईसर : पुढारी वृत्तसेवा

बोईसर पूर्वेकडील दगड खाण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नागझरी ग्रामपंचायत अंतर्गत एका दगडखाणीत एका ठेकेदाराचा उंचावरून पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (मंगळवार) सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली आहे.

जयेश मोहन काकड (वय 32) रा. काकडपाडा (नागझरी) असे मृत पावलेल्या ठेकेदाराचे नाव आहे. तो नागझरी ग्रामपंचायतचा विद्यमान सदस्य होता. नेहमीप्रमाणे जयेश खदानीच्यावर मातीचा ढीगारा काढण्याचे काम करत होता. दरम्यान त्याचा तोल जाऊन तो ७० ते ८० फुटांवरून दगड खाणीत खाली कोसळला. त्‍यामुळे तो गंभीर जखमी झाला होता.

नागझरी येथील अधिकारी लाईफ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदनासाठी मनोर येथे पाठवण्यात आले आहे. या घटनेची मनोर पोलिसांनी नोंद करुन घेत अधिक तपास सुरू केला आहे. दरम्यान, दगडखाणींवर काम करणाऱ्या कामगारांना दगडखाण मालक अथवा चालकाकडून आवश्यक साधने पुरवली जात नसल्यानेच अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे येथील कामगारांचे म्हणणे आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news