

पालघर: पालघर नगरपरिषद हद्दीमधील ८९ इमारती नगरपरिषद प्रशासनाकडून अति धोकादायक जाहीर करण्यात आल्या आहेत. आगामी मान्सूनच्या दृष्टिकोनातून खबरदारी घेण्यात आली असून ही यादी जाहीर करण्यात आली आहे. जीर्ण इमारती यात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाला संभाव्य धोका लक्षात घेऊन ही पूर्व खबरदारी नगर परिषदेने घेतली आहे. धोकादायक असलेल्या इमारतींना नगरपरिषदेकडून पुढील दहा दिवसात नोटीसा बजविण्यात येणार आहेत.
त्यानंतर अति धोकादायक इमारतीतील रहिवाशांनी लवकरात लवकर इमारती रिकाम्या कराव्यात, ज्या इमारती धोकादायक व संरचनात्मक दुरुस्तीच्या आहेत त्यांच्या मालकांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून ते नगर परिषदेकडे सादर करावे. ज्या इमारती स्वखचनि स्ट्रक्चरल ऑडिट नाही करणार त्या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट नगरपरिषद कडून करण्यात येईल व ती रक्कम मालकाकडून वसूल करण्यात येणार असल्याचे नगर परिषदे कडून सांगण्यात आले आहे.
अति धोकादायक इमारतींमध्ये जुन्या नगर परिषद कार्यालयच्या इमारतीसह टेलिफोन एक्सचेंज इमारत प्रशासकीय कार्यालय, शाळा व व्यापारी संकुलांचा समावेश आहे. अतिधोकादायक व राहण्यास अयोग्य असलेल्या इमारती तातडीने निष्कासीत करून त्यावर कारवाई करण्यास नगरपरिषदेतर्फे प्राधान्य देण्यात येणार आहे. याबाबत नगरपरिषदेकडून कायद्यातील केला आहे. नगरचा विभागाकडून सुरू नियमांच्या अधीन राहून कार्यवाही करण्यास प्रारंभ असलेल्या सर्वेक्षणातील धोकादायक इमारतींमधील रहिवाश्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे निर्देश पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.
अजूनही धोकादायक इमारती कुठे आहेत का याचे सर्वेक्षण नगररचना विभाग करत आहे. तसेच मागील वर्षीच्या स्थळ पाहणी सर्वेक्षणातून ज्या इमारती धोकादायक ठरविण्यात आल्या होत्या किंवा तपासणीनंतर काही बदल करण्याचे सुचविले होते ते काम पूर्ण झाले की नाही याची देखील तपासणी या सर्वेक्षणात सुरू आहे. पालघर रेल्वे स्थानकासमोर पालघर नगरपरिषदेचे जुने कार्यालय अर्थात जीर्ण झालेली तीन मजली अतिधोकादायक इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर अनेक गाळे व दुकाने सध्या सुरू आहेत. याच परिसरात मुख्य बाजारपेठ आहे. नगरपरिषदेतर्फे दरवर्षी ही इमारत अति धोकादायक म्हणून जाहीर केली जाते. मात्र गाळे व दुकानदार या इमारती मधून बाहेर पडताना दिसत नाहीत. ही जीर्ण इमारत कोसळून एखादी दुर्घटना घटून जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न विचारला जात आहे. नगरपरिषद प्रशासनातर्फे येथील गाळेधारकांना व दुकानदारांना नोटीसी बजावण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.