नाशिक : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जण ठार

नाशिक : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जण ठार
Published on
Updated on

चांदवड; पुढारी वृत्तसेवा : चांदवड तालुक्यातील शिंगवे शिवारातील लासलगाव – मनमाड रस्त्यावर ट्रक व दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील मनमाडचे दोघे जण जागीच ठार झाले. याबाबत सलमान मुन्सी कुरेशी (वय २९) यांनी चांदवड पोलिसांत फिर्याद दिली. ट्रक चालक मोहम्मद जहांगीर अब्दुल गणी (रा. मुजफ्फरनगर, अकोला) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मनमाड येथील आययुडीपी येथील रहिवाशी असलेले यासीन इस्माईल कुरेशी (वय ४७) व हुजेब यासीन कुरेशी (वय २०) हे दुचाकीने (एम. एच. ४१, बी. डी. ८८९७) लासलगाव – मनमाड रस्त्याने मनमाडकडे येत होते. यावेळी तालुक्यातील शिंगवे शिवारातील खडीक्रेशर समोर पाठीमागच्या बाजूने भरधाव येणाऱ्या ट्रकने (एमएच २८, एबी ८३९९) दुचाकीला जोरदार धडक दिली.

यात दुचाकीवरील यासीन इस्माईल कुरेशी व हुजेब यासीन कुरेशी हे रस्त्यावर फेकले गेले. डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मनमाड येथील नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. कुरेशी कुटुंबीयांवर काळाने घाला घातल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, पोलीस हवालदार अशोक पवार यांनी घटनास्थळी दाखल  झाले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news