Zilla Parishad Nashik | शिक्षणमंत्री दादा भुसे उद्या घेणार जिल्हा परिषद शिक्षणाचा आढावा

शाळा दुरुस्ती व बांधकामासंदर्भातही महत्त्वपूर्ण चर्चा बेठकीत होणार
नाशिक जिल्हा परिषद / Zilla Parishad Nashik
नाशिक जिल्हा परिषद Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे शुक्रवारी (दि. १३) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी १२ वाजता बैठक होणार आहे. यापूर्वी मंत्री भुसे यांच्या दोन बैठकींचे नियोजन झाले होते, मात्र दोन्ही वेळा त्या बैठकांचे मुहूर्त हुकले होते. त्यामुळे यावेळी बैठक प्रत्यक्षात होते की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या बैठकीत मुख्यतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या दुसऱ्या टप्प्यातील २०० दिवसांच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी, कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम, पीएम-श्री शाळा, शाळांच्या पायाभूत सुविधा विकास योजना, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण कार्यक्रम, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना, विविध शिष्यवृत्ती योजना, आधार पडताळणी, आपार आयडी, शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आणि हेल्थ कार्ड वितरण, पवित्र पोर्टलवरील भरती प्रक्रिया (टप्पा क्रमांक २), शिक्षक समायोजन, शिक्षकांच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती याबाबत चर्चा होणार आहे.

नाशिक जिल्हा परिषद / Zilla Parishad Nashik
शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचे ओझे कमी करणार: शिक्षणमंत्री दादा भुसे

तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत कसे व्हावे, आदर्श शाळा मोहीम, 'सुपर ५०' उपक्रम आणि शिक्षक-संस्था-अधिकाऱ्यांनी राबवलेले विविध उपक्रम यावरही चर्चा अपेक्षित आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी सर्व तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला आहे. याशिवाय विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन बैठकीसंदर्भातील विषयांवर आवश्यक माहिती वेळेत तयार ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. शाळा दुरुस्ती व बांधकामासंदर्भातही महत्त्वपूर्ण चर्चा या बैठकीत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news