नाशिक : गत महिन्यात राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाकडून दिव्यांग प्रमाणपत्रांसह युनिक डिसएबिलीटी कार्डची (युडीआयडी कार्ड) पडताळणीचे आदेश दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या दिव्यांगत्वाचा लाभ घेणाऱ्या ६१४ कर्मचाऱ्यांपैकी 605 दिव्यांग कर्मचाऱ्यांनी पडताळणी पूर्ण केली आहे. तर, 9 कर्मचाऱ्यांची पडताळणी पडताळणी बाकी आहे.
गतवर्षी जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास अधिका-यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बनावट आढळल्याने तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र पडताळणीचे निर्देश दिले होते. त्यावेळी त्यावेळी ६१४ कर्मचाऱ्यांपैकी 595 कर्मचाऱ्यांनी पडताळणी करत युडीआयडी कार्ड दिले होते. दरम्यान तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बदली झाल्याने युडीआयडी कार्डचा मुद्दा मागे पडला होता. मात्र, दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर धडाडीचे आयएएस अधिकारी मुंढे यांनी दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, मुंढे यांनी बोगस दिव्यांगांची झाडाझडती घेण्याचे लेखी आदेश सप्टेंबर महिन्यात जिल्हा परिषदेला दिले. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागांना पत्र काढत दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी करून युडीआयडी सादर करण्याते निर्देश दिले.
कार्यरत 614 दिव्यांग कर्मचाऱ्यांपैकी 605 कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी होऊन युडीआयडी दाखल केले आहे. 9 कर्मचाऱ्यांचे युडीआयडी दाखल झालेले नाही. यात एक कर्मचारी गैरहजर आहे, दोन कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. दोन कर्मचाऱ्यांचे प्रमाणपत्र न्यायप्रविष्ठ आहेत तर चार कर्मचाऱ्यांनी प्रमाणपत्रासाठी नोंदणी केली असून, त्यांचा पुढील आठवडयात युडीआयडी प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात आले.
विभागनिहाय दिव्यांग कर्मचारी
सामान्य प्रशासन (54), आरोग्य (63), कृषी (1), ग्रामपंचायत (50), प्राथमिक शिक्षण (409), बांधकाम 1 (4), लेखा व वित्त (3), पशुसवंर्धन (12), लघुपाटबंधारे (0), ग्रामीण पाणी पुरवठा (1), महिला बालकल्याण (8)
पडताळणी शिल्लक कर्मचारी गोषवारा
सामान्य प्रशासन (1), ग्रामपंचायत (5), प्राथमिक शिक्षण (2), आरोग्य (1)