Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाची धुरा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्याकडे

Simhastha Kumbh Mela | त्र्यंबकेश्वरला पाहणी करत कामे पूर्ण करण्याच्या यंत्रणांना सूचना
Simhastha Kumbh Mela
Simhastha Kumbh Mela
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. ३१) होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्याकडे प्रशासनाने त्र्यंबकेश्वर येथील कामकाजाची जबाबदारी सोपवली आहे. पवार यांनी मंगळवारी (दि. २७) तातडीने त्र्यंबकेश्वर येथे भेट देत विविध विकासकामांची पाहणी केली.

Simhastha Kumbh Mela
Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळ्यातून घडणार 'नवे नाशिक'; पुढील 40 वर्षांचा आराखडा तयार!

यावेळी त्यांनी कुशावर्त तीर्थ तसेच त्र्यंबकेश्वरच्या गंगाघाट परिसराची पाहणी करत संबंधित कामांचा आढावा घेतला व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना दिल्या. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे,

परिसरातील विकासकामे वेळेत पूर्ण करणे आणि कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय राखणे महत्त्वाचे आहे. या दृष्टीने ओमकार पवार यांनी प्रत्यक्ष स्थळभेट देऊन कामांची सद्यःस्थिती जाणून घेतली. यावेळी कुशावर्त तीर्थ परिसराची पाहणी करत तेथील कामांचा आढावा घेतला.

Simhastha Kumbh Mela
Nashik Kumbh Mela 2026: नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात 'अमृत स्नान' कधी? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथील गंगाघाट परिसर सुरू असलेल्या कामांची पाहणी करत, कामांची सद्यःस्थिती, उर्वरित कामे आणि ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी पवन दता, जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील, तहसीलदार गणेश जाधव व गटविकास अधिकारी रविकांत सानप उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news