दोन भावांनी केलेल्या मारहाणीत तरूणाचा मृत्यू

बुबळीत दोन भावांच्या मारहाणीत तरूण ठार, एक संशयित ताब्‍यात
Youth killed in beating by two brothers
दोन भावांनी केलेल्या मारहाणीत तरूणाचा मृत्यूFile Photo
Published on
Updated on

सुरगाणा : पुढारी वृत्तसेवा

सुरगाणा शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या बुबळी येथे दोन भावांकडून झालेल्या गंभीर मारहाणीत (28 वर्षीय) तरूण ठार झाल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील श्रीभुवन येथील पतीने पत्नीची हत्या केल्याच्या घटनेला आठ दिवस होत नाहीत तोपर्यंत बुबळी येथे दोन भावांकडून युवकाची हत्या झाल्याची घटना घडल्याने तालुका हादरला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मृत युवकाचे नाव हरिचंद्र मनोहर देशमुख (वय 28) रा. बुबळी असे असून मृत हरिचंद्र याची पत्नी मनीषा देशमुख हिने याबाबत फिर्याद दाखल केली आहे. याच बुबळी गावातील नारायण प्रभाकर चौधरी आणि किरण प्रभाकर चौधरी या दोन्ही भावात आणि हरिचंद्र यांच्यात वाद होऊन झालेल्या मारहाणीत नारायण व किरण या दोघांनी हरिचंद्र यास लोखंडी पाईपने डोक्यात आणि हातापायावर मारहाण केली. केलेल्या या मारहाणीत डोक्यात गंभीर दुखापत झाली. गंभीर मारहाणीमुळे हरिचंद्र याचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर दोघे भाऊ फरार झाले होते.

त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून एक संशयित आरोपी नारायण चौधरी यास वणी येथून चार वाजण्याच्या दरम्यान ताब्यात घेतले. दुसऱ्या भावाचा शोध पोलीस घेत आहेत. हि घटना शुक्रवारी (दि.27) रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली. मारहाणीचे निश्चित कारण तपासाअंती समोर येईल. हरिचंद्र याच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल मोरे हे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news