

नाशिकरोड: धावत्या रेल्वेमधून पडून एका युवकाचा मृत्यू झाला आहे. देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक परिसरात रविवारी (3 ऑगस्ट) रात्री अकरा वाजेच्या दरम्यान 30 ते 35 वयोगटातील तरुणाचा धावत्या गाडीतून पडून मृत्यू झाला.
मयत तरुणाच्या अंगावर निळ्या रंगाचा हाफ बाह्यांचा टी-शर्ट व काळ्या रंगाची सिक्स पॉकेट पॅन्ट आहे. याप्रकरणी नाशिक रोड रेल्वे पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तरुणाबाबत कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी नाशिक रोड लोहमार्ग पोलीस ठाण्याचे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.