नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्याकडून तरुणीला शिवीगाळ

सोशल माध्यमावर व्हिडिओ व्हायरल
Crime
Crime

सिन्नर|नाशिक : भाजपचे सिन्नर तालुका पदाधिकारी असलेले जयंत आव्हाड यांच्याकडून एका तरुणीला शिवीगाळ होत असल्याचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

सदर तरुणी सिन्नर तालुका भाजप कार्यालयात नोकरी करत होती असे समजते. वेतन अदा करण्याच्या कारणावरून बाचाबाची सुरू असल्याचे व्हिडिओमध्ये प्रथमदर्शनी दिसत आहे. व्हिडिओमध्ये आव्हाड यांच्या शेजारी भाऊसाहेब शिंदे नामक ज्येष्ठ पदाधिकारीदेखील बसलेले दिसत आहेत. त्यावरून सदरचा व्हिडिओ भाजपच्या सिन्नर तालुका कार्यालयातील असावा, असेही बोलले जात आहे. हा व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

तरुणीकडून एक लाखाची चोरी

सदर तरुणी तीन-चार महिन्यांपासून सिन्नर तालुका भाजप कार्यालयात नोकरीस होती. तिने दहा-बारा दिवसांपूर्वी ऑफिसच्या कॅबिनमधून एक लाख रुपये चोरी केल्याची तक्रार जयंत आव्हाड यांनी सिन्नर पोलिसांत दिली आहे. चोरीनंतर आव्हाड यांनी तरुणीकडे विचारणा केली असता तिने चोरीची कबुली दिली. तसेच कुटुंबीय कर्जबाजारी असल्याने पैशांची गरज होती, असे सांगून चार-पाच दिवसांत पैसे परत करू, असा शब्द दिला. मात्र, पैसे परत केले नाही. त्यामुळे आपण पोलिसात तक्रार दिल्याचे आव्हाड यांनी नमूद केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news