Yeola Shivsrushti | येवल्यातील शिवसृष्टी प्रकल्पाचे आज लोकार्पण

उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा
Chhagan Bhujbal, Ajit Pawar, Girish Mahajan
येवल्यातील शिवसृष्टी प्रकल्पाचे आज लोकार्पण Pudhari Photo
Published on
Updated on

नाशिक : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून व संकल्पनेतून साकारलेल्या येवला शिवसृष्टी प्रकल्पाचे बुधवारी (दि. २) सायंकाळी ४ वाजता जनता विद्यालय मैदानावर लोकार्पण करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते, पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.

यानिमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंतांच्या शिवचरित्रावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अभिनेते भूषण प्रधान, अविनाश नारकर, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, गायक आदर्श शिंदे, शिवशाहीर प्रा. डॉ. गणेश चंदनशीवे यांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news