World Photography Day | एका छायाचित्रातून उलगडते हजारो शब्दांची कथा

World Photography Day | जागतिक छायाचित्रण दिनविशेष
Photography
PhotographyPudhari
Published on
Updated on

नाशिक : मंगेश गायकवाड
जागतिक छायाचित्रणदिन दरवर्षी १९ ऑगस्टला साजरा केला जातो. पूर्वी केवळ आठवणी जपण्यासाठी वापरले जाणारे छायाचित्रण आता पत्रकारिता, जाहिरात, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांचा महत्त्वाचा भाग झालेले आहे.

Photography
Pune Nashik Highway Traffic: नाशिक फाटा-खेड उन्नत महामार्गाला अखेर गती; ६०० कोटींच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा

दि. १९ ऑगस्ट १८३९ रोजी फ्रान्समध्ये डॅग्युरिओटाइप या छायाचित्रण प्रक्रियेची अधिकृत घोषणा करण्यात आली. या प्रक्रियेच्या विकासात फ्रेंच कलाकार आणि संशोधक लुई डॅग्युरे यांचे महत्त्वाचे योगदान होते. या घटनेच्या स्मरणार्थ दि. १९ ऑगस्ट हा दिवस जागतिक छायाचित्रणदिन म्हणून साजरा केला जातो.

कॅमेरा तंत्रज्ञानात गेल्या काही वर्षांत मोठा बदल झाला आहे. पूर्वी कॅमेरा आणि फिल्मच्या मदतीने फोटो काढले जात होते. आता स्मार्टफोनमुळे जवळपास प्रत्येकाच्या हातात कॅमेरा उपलब्ध आहे. त्यामुळे फोटो काढणे आणि ते काही क्षणांत इतरांपर्यंत पोहोचवणेही सोपे झाले आहे. सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे छायाचित्रणाचा वापरही वाढला आहे.

Photography
Pune Nashik Highway Traffic: नाशिक फाटा-खेड उन्नत महामार्गाला अखेर गती; ६०० कोटींच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा

विशेषतः पत्रकारित्यात एखाद्या घटनेचे छायाचित्र बातमीला अधिक स्पष्टता देते. अपघात, सामाजिक उपक्रम, सण - उत्सव किंवा एखाद्या महत्त्वाच्या घटनेचे फोटो त्या घटनेची प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेण्यास मदत करतात. मोबाइल कॅमेऱ्यांमुळे फोटोग्राफी सहज झाली असली, तरी चांगला फोटो घेण्यासाठी योग्य क्षण, प्रकाश, रचना आणि विषयाची समज महत्त्वाची असते. त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर छायाचित्रणाची पद्धत बदलली, तरी चांगले छायाचित्र टिपण्याचे महत्त्व आजही कायम आहे.

आता प्रत्येकाच्या हातात कॅमेरा आहे. त्यामुळे फोटोग्राफी शिकण्याची आणि वेगवेगळे प्रयोग करण्याची संधीही वाढली आहे.

- जयेश पाटील, छायाचित्रकार

पत्रकारित्यात फोटोला खूप महत्त्व आहे. एखाद्या घटनेचा फोटो पाहिल्यावर बातमीतील परिस्थिती लोकांना अधिक स्पष्टपणे समजते.

- नागेश गोणेकर, विद्यार्थी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news