World Photography Day 2024: जुने कॅमेरा संग्रहाचे 'प्रविण' मानकरी

जागतिक फोटोग्राफी दिन: डिजीटल 'एआय' युगातही जुने कॅमेऱ्यांचा स्मृतीसह कॅमेरेही रम्य
प्रविण मानकर, कॅमेरा संग्रहाक, नाशिक.
प्रविण मानकर, कॅमेरा संग्रहाक, नाशिक.pudhari news network
Published on
Updated on

नाशिक : तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी कृष्ण धवल काळातील राेलचे कॅमेरे आणि त्यांतून काढलेल्या छायाचित्राच्या सप्तरंगी आठवणी कायम हृदयावर कोरल्या जातात. नाशिकमधील अनेकांनी त्यांच्या काळी पार्श्वभूमी असलेले अल्बम आणि जुन्या काळातील कृष्णधवल कॅमेरे जतन करुन ' क्लासिक- रेट्रो' ठेवा जतन करुन ठेवला आहे. प्रवीण मानकर त्यातीलच एक..!

मानकर यांच्या संग्रहात १९५० पासूनचे ॲण्टीक कॅमेरे आहेत. सर्वच कॅमेऱ्यावर त्याचे विलक्षण प्रेम. म्हणूनच बंगल्याच्या दिवाणखाण्यात त्यांनी आपल्या कॅमऱ्यांचा सुरेख 'डिप्ले'ही केला आहे. इतकेच नव्हे तर त्यांची नियमित साफसफाई करणे हा त्यांचा दिनक्रमच! आठवणीचा ठेवाही चकाकलाच पाहिजे हे त्यांचे साधे गणित. त्यांच्या संग्रहातील सर्वात जुना कॅमेरा तो १९५० या वर्षातला. त्याकाळी कॅमेऱ्यांसाठी १२० ची फिल्म असायची आणि एक रिळामध्ये १८ फोटो घेता येत असे.

प्रविण मानकर, कॅमेरा संग्रहाक, नाशिक.
नाशिक : प्रवीण मानकर यांच्या संहग्रातील जुने कॅमेरे त्यांनी डिस्ले करुन ठेवले आहेत.pudhari news network

त्या काळी भारतात कॅमेरे महाग असायचे म्हणून त्यांनी सिंगापूर 'ड्युटीफ्री' येथून व्हिडीओ कॅमेरा मागवला. पाण्याखाली वापरता येईल अशा वैशिष्टांचा कॅमेराही त्याच्याकडे आहे. २०१० मध्ये सौदी अरेबिया येथे असताना समुद्रात डायव्हिंग अन स्नॉर्कलिंग करण्याचा छंद त्यांना लागला. तेव्हा परण्याखाली फोटो व व्हिडीओ घेण्यासाठी तो घेतला. त्यात पाण्याखाली २० मीटर पर्यंत फोटो घेता येतात.

काही कॅमेऱ्यांचा डिप्ले केला तर उर्वरित कपाटात ठेवले आहेत. इतरांनी माझ्या वस्तूस हात लावावा, त्या न्याहाळाव्या अ‌न‌् प्रश्न विचारावे असे वाटते. आठवणी, प्रश्नांची उत्तरे देतांना डोहातून वर येतात. कॅमेरा पुराण खूप रम्य आहे. छायाचित्रण मागे पडलं अन मी चल-चित्रणात गुंतलो. १९८५ मी चल‌्चित्रणात गुंतलो. आज 'डिएसआर'सह इतर अत्याधुिक कॅमेरे आहेत.

प्रविण मानकर, कॅमेरा संग्रहाक, नाशिक.

'क्लीक'चा आवाज श्रवणीय

'अगफा अइसोली'चाही कॅमेराही मानकर यांच्या संग्रहात आहे. त्याला लेदर असून त्यावरील केस मानकरांना भुरळ घालतात. हा कॅमेरा 'क्लीक' केल्यावर लेन्सचा आणि शटरची उघडझाप केल्यानंतर एक विशिष्ट आवाज येतो. तो जितका श्रवणीय तितकाच आजच्या डिजीटल जमान्यात दुर्मीळच.! असे ते सांगतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news