

नाशिक : निल कुलकर्णी
कुंभनगरी, तीर्थक्षेत्र आणि विकसित होणारी सांस्कृतिक राजधानी म्हणून नाशिकचा नावलाैकीक होत आहे. पेशव्यांचे वास्तव असलेल्या या नगरीत पुरातत्व विभागाासह अनेक खासगी वस्तुसंग्रहायले देखील आहेत, मात्र त्याची प्रसिद्धी फारशी होत नसल्याने सर्वच वस्तुसंग्रहालात पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
'वेगाने बदलणाऱ्या समुदायांमध्ये संग्रहालयांचे भविष्य' यंदाच्या वस्तू संग्रहालय दिनाची संकल्पना आहे. संग्रहालयामुळे भावी पिढ्यांना देशाचा जाज्वल्य इतिहास, वारसा समजतो. अनेकांना संशोधनासाठी दस्ताऐवज उपलब्ध होतात. संग्रहालयांमध्ये दुर्मीळ वस्तू, मूर्ती, दस्ताऐवज, कलाकृतींचा संपन्न वारसा देशाचा अनमोल ठेवा असतो. यावस्तु समृद्ध इतिहासाची साक्ष देतात. मात्र नाशिकमधील संग्रहालये योग्य आणि सर्वंकर्ष ब्रॅण्डिंग तसेच प्रसिद्धीअभावी पर्यटनकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
सराफ बाजार येथील सरकारवाड्यात भारतीय पुरातत्व विभागाचे प्राचीन वस्तुसंग्रहालयात दुर्मीळ वारसा आहे. येथे प्राचीन मूर्तींसह शस्त्रे, चित्र यांचा संपन्न वारसा आहे. मात्र, सराफ बाजारातील या वस्तुसंग्रहालाकडे जाणारी दिशादर्शक पाटीही या परिसरात पुरातत्व विभागातर्फे लावण्यात आलेली नाही. सरकारवाड्याच्या दोन्ही बाजूने फुलवाले, सुकामेवा विक्रेते आणि भाजीवाल्यांच्या अतिक्रमांचा नेहमीच वेढा पडलेला असतो. पुरातत्व विभागातील प्रसिद्धी पत्रक, पुस्तिकांमध्ये संग्राहलयाबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र गावातील अत्यंत रहदारी, दाटीवाटीत वसलेल्या सरकारवाड्यात पर्यटक जात नसल्याचे चित्र आहे.
नाशिकची सर्वात जुनी सावाना संस्थेच्या आवारातही अत्यंत समृद्ध वस्तुसंग्रहालय आहे. परंतु याची नाशिकमधील अनेकांना माहिती नाही. सावाना वस्तुसंग्रहालाच्या नावाचा फलकही सावाना आवारात नाही. त्यामुळे पर्यटकांना याची माहितीही होत नाही. विशेष म्हणजे, सावानाच्या समृद्ध ठेवा असलेल्या संग्रहालयाल पूर्ण वेळ कर्मचारी, क्युरेटर नसल्याने संग्रहालय पाहण्यासाठी येणाऱ्यांना ग्रंथालय कर्मचारी माहिती देत असल्याचे चित्र आहे. महापालिकेत मनसेची सत्ता असताना राज ठाकरे यांच्या संकल्पेनेतून उभारलेले गंगापूर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचे नूतनीकरण सुरू असल्याने तेही बंद आहे.
यासह शहरात काही खासगी व्यक्ती, संस्थांचेही संग्रहालये असून त्याची प्रसिद्धी सामाजिक माध्यमे, वृत्तपत्रातून नियमित होत असल्याचे चित्र आहे. कामठवाडा येथे एका व्यक्तीचे प्राचिन वस्तुसंग्रहालाची माहितीपट सध्या सामाजिक माध्यमांवर गाजत आहे. यासह मविप्रचे उदोजी महाराज वस्तुसंग्रहालय, त्र्यंबकरोडवर खासगी डॉक्टरचे मानवी जेनिटीक, गुणसूत्रे याची माहिती देणारे आणि सिन्नर येथील माळेगाव येथील औद्योगिक वसाहतीत भूगर्भ खनिज-गारगोटींचे संग्रहालये शहरात आहेत.
पर्यटकांची अनास्था पाश्चात्य देशांप्रमाणे आपल्याकडे संग्रहालये पाहण्याची आस्था दिसत नाही, करिता संग्रहालय दिनाचे औचित्यावर चर्चासत्र, व्याख्यान आयोजित केले. नाशिकमधील सर्वच शाळा, शैक्षणिक संस्थामध्ये जाऊन सावाना संग्रहालयाची माहिती देणार असून विद्यार्थ्यांसाठी येथे निशुल्क प्रवेश देणार आहोत. भेट देणाऱ्याची संख्या वाढवी म्हणून वर्षभर उपक्रम राबवणार आहोत.
ॲड. अभिजित बगदे, संग्रहालय सचिव, सावाना, नाशिक.
सरकारवाडा
सावाना
उदोजी महाराज वस्तुसंग्रहालय
मनपाचे शस्त्र संग्रहालय
कामठवाडा
त्र्यंबकरोडवरील प्रत्येक एक संग्रहालय
भुगर्भ खनिज संग्रहालय (सिन्नर).