जागतिक कला दिनविशेष ! अनवट वाटांचे ‘कला पांथस्थ’

World Art Day Special : कलेला उंची देणारे ‘अनभिषिक्त’ विश्वकर्मा
नाशिक
नाशिक : प्रतीक पंडित आणि नितीन पवार यांचा 'अनहद' ग्रुप.Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : निल कुलकर्णी

कुणी संगीतामध्ये नवीन विचार मांडला तर कुणी चित्र, शिल्प कलाकृतीत धाडसी, वर्तननिषेध ताज्य गोष्टींवर संशोधन करुन आणि परंपरांना छेद देणारा विचार मांडत समाजातील समकालिन प्रश्नांवर भाष्य केले, हे सारे कला प्रवासी आज अनवट कलावाटांवरील अनिभिषिक्त किमयागार ठरु पहात आहेत.

प्रस्थापित, मळालेल्या अन‌् पारंपरिक वाटा नाकारुन, राज्यातील काही कलाकार कलेतून नवे, विचार, वळण आणि नवा प्रवाह रुजवून आपल्या कलाकृती सातासमुद्रापार नेत आहेत. अशाच चौकटबाह्य कलाकृतींमुळे कलेतील अनभिषिक्त किमयागार ठरलेल्या कलाकारांचा वेध ‘पुढारी’ने जागतिक कला दिनाच्या निमि्त्ताने घेतला.

नाशिकच्या प्रतिक शिंदे अन‌् अव्दय पवार आदी कलाकारांनी, शास्त्रीय, पाश्चिमात्त संगातीत फ्यूजनचा नवा प्रयोग केला. महेश मानकर यांनी गाढव प्राणी घेऊन समकालिन राजकीय, सामाजिक स्थितीवर रचनाचित्रातून भाष्य केले. मानसी सागर या चित्रकर्तीने पारंपरिक कलापरंपरेच्या बाहेर जात स्वतःची चित्रशैली निर्माण केली. ‘स्त्रियांना अनेक जबाबदाऱ्या व बंधने असल्यामुळे त्यांना चांगले काम करता येत नाही" या समजुतीला त्यांनी चपराक दिली. तथाकथित संकल्पना, मर्यादांची चौकट मोडून कुठलेही नवी गोष्ट केल्यास प्रारंभी विरोध आणि नंतर रसिक मान्यता मिळतेच, असा विश्वास सार्थ करणारे कलेतील हे काही अनिभिषिक्त किमयागार कलाविश्वाला नवा आयाम, रुप, रंग आकार देत आहेत.

नाशिक
‘मानसी’ची चित्रकार ‘ती’ मानसी सागर,Pudhari News Network

मॉडेल मिळत नाही, चित्र विषय कोणाला समजत नाहीत याकडे दूर्लक्ष करुन वेगळी चित्रशैली निर्माण करण्याचा प्रयत्न करते. ‘स्त्रियांना अनेक जबाबदाऱ्या व बंधने असल्यामुळे त्यांना चांगले काम करता येत नाही’ या समजुतीला छेद देण्याचा प्रयत्न केला जो यशस्वी होत आहे. स्वतःच्या कलेवर ठाम विश्वास ठेवून कार्य करताना वाटेवरील संघर्ष, अडथळे, विरोध हळूहळू दूर होताना दृष्टीपथास येत आहे. अनेक देशांमध्ये माझी कला वाखाणली जाते, याचे समाधान आहे.

मानसी सागर, चित्रकर्ती. नाशिक.

शास्त्रीय-पाश्चात्य संगीतांचे सुरेख ‘प्रतीक’ - फ्यूजन हे कंफ्यूजन करणारे नसावे. त्यात साैंदर्य नाविन्यता असावी. शास्त्रीय संगीतातील अभिजात रागांची अभिजातता कायम ठेऊन पाश्चत्य संगातीतील सांगितिक वाद्यांच्या मदतीने संगीत ‘कंपोझिशन’ केल्या. यमन, जोग, भिन्न षडज‌् आदी रागांमध्ये नवे प्रयोग करुन आरंभ, क्रॉसरोड, प्लॅनेट-९ आदी नवीन रचनांचे कार्यक्रम केले. रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. मलेशियामध्येही हा प्रयोग केला.

सर्व रचनाकार,‘अनहद‌्’ ग्रुप.नाशिक.

नाशिक
महेश मानकरPudhari News Network

समकालिन परिस्थितीत माणसांचे विचारांमध्ये मोठ्या प्रमाणात मूर्खपणा दिसून येतो. राजकीय असो, धार्मिक-अंधश्रद्धा असो किंवा वर्चस्वावादी भूमिका सर्वच क्षेत्रात मूर्खपणाचे कळस गाठलेले दिसतात. समाजातील अशीच सद्यकाळातील मूर्खपणाचे, अविवेवकीपणाचे विचार गाढव या प्राण्याला कलाकृतीत घेऊन कलाकृतींतून भाष्य केले आहे आहे. कलेतून रशियातही संवाद साधता आला.

महेश मानकर, समकालिन कंपोझिशन चित्रकर्मी, नागपूर.

नाशिक
‘त्या’ लोकांचे दु:ख मांडणारा धाडसी ‘चरण’ - चरणदास जाधवPudhari News Network

‘त्या’ लोकांचे दु:ख मांडणारा धाडसी ‘चरण’ - देवदासी, जोगता, देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया, तृतियपंथीयांसह ‘एलजीबीटीआय’ समुहातील व्यक्तींची दु;ख, मी रेखाचित्र, काष्ठशिल्प, चित्र, फायबर अशी बहुविध माध्यमे वापरुन त्याच्या वेदनांवर कलेतून भाष्य केले. कलाकृती काढताना प्रथम विरोध झाला. मात्र त्यांतील संकल्पना समल्यानंतर समाजमान्यताही मिळत गेली. अनेक कलाकृती युक्रेन, पार्तुगाल आदी देशांमधील प्रदर्शनात गौरवली गेली.

चरणदास जाधव, चित्रकर्मी, शिल्पकार, मूंबई.

नवविचारांना साद घालणारे कलावंत

आदित्य शिर्के, मुक्ता अवचट-शिर्के, कोमल देहाळे (अनावृत्त चित्रशैलीवर संशोधन), शुभम साळवे(छत्रपती संभागीनगर), प्रा. स्नेहल तांबुलवाडीकर, पीयूष उरकुडे(यवतमाळ), प्रसाद आव्हाड(सिन्नर),

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news