

मालेगाव : तालुक्यातील मुदत संपणाऱ्या १२५ पैकी ६३ ग्रामपंचायती सरपंच पदासाठी महिला आरक्षित झाल्या आहेत. महिला सरपंचपदाचे आरक्षण निश्चितीसाठी बुधवारी (दि.३०) तहसील कार्यालयात प्रांताधिकारी नितीन सदगीर यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी तहसीलदार विशाल सोनवणे उपस्थित होते.
एकूण सर्वसाधारण असलेल्या ६७ पैकी ३४ जागा सर्वसाधारण महिला आरक्षित करण्यात आल्या नागरिकांचा मागास प्रवर्गमधील ३४ पैकी १७ जागा नामप्र महिला राखीव, अनुसूचित जमातीच्या १६ पैकी ८ व अनुसूचित जातीच्या ८ पैकी चार जागांवर महिला आरक्षण चिठ्ठीद्वारे काढण्यात आले.
राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या बडनेर, खाकुर्डी, येसगाव खुर्द, आघार बुद्रुक, दाभाडी, रावळगाव, वडगाव या प्रमुख गावांमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण निघाल्याने मातब्बरांचा हिरमोड झाला. आता या कारभाऱ्यांना कारभारणीला चाल द्यावी लागणार आहे. याबरोबरच चंदनपुरी, निळगव्हाण, कळवाडी, टेहरे, अस्ताणे ही गावे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव आहेत. यापूर्वी तहसीलदार सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली २८ जुलैला सरपंचपदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण काढण्यात आले होते.
अनुसूचित जाती : सातमाने, साकुरी (नि.), माल्हणगाव, चोंढी.
अनुसूचित जमाती : सावतावाडी, ज्वार्डी (बु.), हिसवाळ, झोडगे, मेहुणे, खडकी, कंधाणे, एरंडगाव.
नागरिकांचा मागास प्रवर्ग : निळगव्हाण, दुधे, टोकडे, शेंदुर्णी, चिंचवे (गा.), कळवाडी, गरबड , नागझरी, डावली, चंदनपुरी, जळकू, नरडाणे, टेहरे, अस्ताणे, हाताणे, सायने खुर्द, पाडळदे.
सर्वसाधारण : वडनेर, कंक्राळे, बेळगाव, खाकुर्डी, टाकळी, देवघट, कुकाणे, जाटपाडे, उंबरदे, देवारपाडे, वळवाडे, दापुरे, दसाणे, टिंगरी, येसगाव खुर्द, खायदे, चिंचावड, आघार बुद्रुक, दाभाडी, रावळगाव, लेंडाणे, पांढरूण, मोहपाडे, अजंग, आघार खुर्द, गिलाणे, दहिवाळ बोधे, लोणवाडे, पाथर्डे, मळगाव, रोझे, कौळाणे गा., साकूर, वडगाव.