Nashik News | झोपेत असलेल्या विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू

वेळेवर उपचाराअभावी सर्पदंशाने विवाहीतेचा वणी येथे मृत्यू
Nashik News | झोपेत असलेल्या विवाहितेचा सर्पदंशाने मृत्यू

वणी : पुणेगांव, ता. दिंडोरी येथील विवाहीतेला झोपेत हाताच्या बोटाला सर्पदंश झाल्याने वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.

Summary

वणी ग्रामीण रुग्णालयात अतिदक्षता वाॅर्डच उपलब्ध नाही. शिवाय संकट काळात वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने विवाहीतेवर योग्य ते उपचार करता आले नाही. परिणामी सर्पदंश झाल्याने अतिवेदना सहन करत असलेली विवाहीतेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

रविवार (दि.१४) रोजी पुणेगांव येथील नेहा गौतम जाधव (वय २०) हीला रात्री १ वाजेच्या दरम्यान राहत्या घरी झोपलेली असतांना डाव्या हाताचे आंगठ्याजवळील बोटाला सर्पदंश झाला. ही घटना लक्षात आल्यानंतर नेहाचा नवरा गौतम विजय जाधव याने पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी तिला तातडीने दाखल केले.

दाखल करतांनाच नेहाची प्रकृती गंभीर होती. प्राथमिक उपचारानंतर तब्बेत गंभीर असल्याने वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेवून जाण्यासाठी नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान वणी ग्रामीण रुग्णालयात रात्री २ वाजेच्या सुमारास आणले असता, वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गाडेकर यांनी आवश्यक ते उपचार करुन नातेवाईकांना अतिदक्षता वाॅर्डची उपलब्धता नसल्याने रुग्णास नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्याचे सांगून रेफर पावती बनवून दिली.

मात्र १०८ रुग्णवाहिकेस संपर्क केला असता वणी व जवळील अंतरावरील रुग्ण वाहिका उपलब्ध न झाल्याने नातेवाईकांनी वणी येथील ग्रामीण रुग्णालयतच उपचारासाठी ठेवले. पिंपळगाव येथील रुग्णवाहिकेस पाचारण करण्यात आलेे. मात्र रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णास हलविण्याचा निर्णय न घेता, येत असलेली रुग्णवाहिकेस नातेवाईकांनी निम्या रस्त्यातून परत पाठवून दिले. दरम्यानच्या सर्वातोपरी उपचार सुरु असतांना सोमवार (दि.१५) रोजी विवाहीतेचा सकाळी सहा वाजेच्या दरम्यान मृत्यू झाल्याची माहीती वैद्यकिय अधिकारी डॉ. गाडेकर यांनी दिली आहे. याबाबत वणी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news