दै. 'पुढारी' ट्रिपल धमाका ऑफरचे विजेते जाहीर

पैठणी, चांदीचे नाणे यासह १०१ आकर्षक भेटवस्तू; तुम्हाला काय मिळाले बघा..
pudhari news network
नाशिक : दै. 'पुढारी' आयोजित ट्रिपल धमाका ऑफर योजनेमधील भाग्यवान विजेत्यांची सोडत जाहीर करताना संजय सोनी, मकरंद सोनी, प्रवीण चांडक. समवेत मिलिंद सजगुरे, राजेश पाटील, शरद धनवटे आदी.(छाया : हेमंत घोरपडे )
Published on
Updated on

नाशिक : महाराष्ट्रातील अग्रगण्य दै. 'पुढारी'च्या वतीने नाशिक जिल्ह्यातील वाचकांसाठी आयोजित ट्रिपल धमाका अाॅफरमधील भाग्यवान विजेत्यांची सोडत बुधवारी (दि. ३) मान्यवरांच्या हस्ते जाहीर करण्यात आली. ११ पैठणी, ११ चांदीची नाणी आणि १०१ इतर आकर्षक भेटवस्तू असलेल्या योजनेची सोडत प्रायोजक सोनी पैठणीचे संचालक संजय सोनी, संचालक मकरंद सोनी, नाशिक ॲडव्हटार्यझिंग ॲण्ड वेल्फेअर असो. (नावा)चे अध्यक्ष प्रवीण चांडक यांच्या हस्ते काढण्यात आली.

दै. 'पुढारी' ने वर्ष २०२३-२४साठी नाशिक जिल्ह्यातील वाचकांसाठी वार्षिक सभासद वर्गणीदार योजनेत केवळ १६५० रुपये भरून ट्रिपल धमाका ऑफर जाहीर केली होती. त्यामध्ये वर्षभर दै. 'पुढारी'चा अंक घरपोच मोफत आणि लकी ड्रॉ योजनेतून ११ वाचकांना पैठणी तितक्याच चांदीच्या नाण्यांसह इतर १०१ भाग्यवान वाचकांना आकर्षक भेटवस्तू देण्याची योजना होती. त्यानुसार भाग्यवान वाचकांची सोडत मान्यवरांच्या हस्ते काढण्यात आली.

प्रारंभी दै. 'पुढारी'चे निवासी संपादक मिलिंद सजगुरे यांनी तीनही अतिथींचे स्वागत करत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी ब्युरो मॅनेजर राजेश पाटील, जाहिरात व्यवस्थापक बाळासाहेब वाजे, वितरण व्यवस्थापक शरद धनवटे यांची उपस्थिती होती. योजनेसाठी सोनी पैठणी, अडावदकर ज्वेलर्स आणि सोनी गिफ्ट यांनी प्रायोजकत्व दिले. शुक्रवार (दि. ५)च्या अंकात सोनी गिफ्ट यांच्यातर्फे प्रायोजित १०१ आकर्षक भेटवस्तू विजेत्यांची नावे प्रसिद्ध करण्यात येतील.

सोनी पैठणीचे भाग्यवान विजेते असे...

१) शैला उमेश पठारे, सातपूर, २) प्रशांत नंदन पाटील, मेरी, म्हसरूळ, ३) डॉ. अमित फुटुरे, डॉक्टर्स एज्युकेशन, मुंबई नाका, ४) दौलत भीमराव जाधव, शिंदेगाव, ५) महेंद्र महादू जगताप, सिडको, ६) तुषार देशपांडे, सिडको, नवीन नाशिक, ७) सागर बाबूभाई पाटील, पंचवटी, ८) संदीप ढोक-पाटील, सिन्नर, ९) अर्चना शरद बोरसे, मालेगाव कॅम्प, मालेगाव, १०) याेगेश गोकुळ सोनजे, चांदवड, ११) दत्तात्रय रघुनाथ बैरागी, नांदगाव.

चांदीचे नाणे भाग्यवान विजते असे...

१) देवीदास पांडुरंग सांगळे, सिन्नर २) हरीश पोपट येवले, मालेगाव, ३) रोहन विकास डोके, ओझर, ४) गणेश अशोक कर्पे, दिंडोरी, ५) रवींद्र छगन चव्हाण, पेठ रोड, ६) हिरा राहडे, नाशिक रोड, ७) स्वप्निल रमेश बडगुजर, शिवाजीनगर, सातपूर, ८) कुसुम विष्णू शिंदे, सिडको, ९) सुदाम डेमसे, सिडको, १०) मिलिंद बापुराव काळे, डीजीपीनगर, नाशिक, ११) समर्थ दत्तात्रय गोल्हार, पाथर्डी फाटा.

विजेत्यांसाठी सूचना

स्पर्धेतील विजेत्यांनी आपआपली बक्षिसे दै. 'पुढारी' नाशिक कार्यालयातून घेऊन जावीत. विजेत्यांनी शुक्रवार (दि. ५)पासून सकाळी १०.३० ते ६.३० या वेळेत स्वत:चे छायाचित्र असलेले ओळखपत्र दाखवून बक्षिसे संकलित करावी.

संपर्क : शरद धनवटे- ८३८०८८३९११.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news