Wild boar attack| रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

Nashik news | मोहाडी परिसरात आधीच बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती
Wild boar attack
Published on
Updated on

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे आज सकाळी सुमारे नऊ वाजेच्या सुमारास रानडुकराच्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोहाडी येथील शेतकरी गोपीनाथ शंकरराव जाधव हे जुन्या ओझर रस्त्यालगत असलेल्या आपल्या शेतात काम करत असताना अचानक एका रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत कुटुंबीयांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी वनविभागाशी संपर्क साधला असून वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. मोहाडी परिसरात आधीच बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. त्यात आता रानडुकरांच्या हल्ल्याच्या घटनांमुळे शेतकरी अधिकच धास्तावले आहेत. वनविभागाने परिसरात पाहणी करून नागरिकांनी शेतात काम करताना सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news