नाशिककरांनो आजच भरुन ठेवा पुरेसे पाणी, शनिवारी 'पाणीबाणी'

Nashik Water Supply | दुरूस्ती कामांसाठी पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार
Nashik News
दुरूस्ती कामांसाठी शनिवारी पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणारfile
Published on
Updated on

नाशिक : नाशिक स्मार्ट सिटी कंपनी तसेच महापालिकेच्या पाणी पुरवठा वितरण विभागामार्फत मनपाच्या विविध जलशुध्दीकरण केंद्रे, विविध बुस्टर पंपींग स्टेशन याठिकाणी तसेच जलकुंभांच्या ठिकाणी फ्लोमीटर्स, व्हॉल्व्स बसविण्याची कामे हाती घेण्यात येणार असल्याने शनिवारी (दि.३०) संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा खंडीत ठेवण्यात येणार आहे. रविवारी (दि. १) कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे.

पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र याठिकाणी एचटी पोल शिफ्ट करणे, गांधी नगर जलशुद्धीकरण केंद्र येथे फ्लोमीटर बसविणे, शिवाजी नगर जलशुद्धीकरण केंद्रात विविध ठिकाणी फ्लोमीटर बसविणे, बूस्टर पंपिंग स्टेशन येथे विविध ठिकाणी फ्लोमीटर बसविणे, सातपूर विभागातील ९०० मि.मी. फीडर पाइपलाइनवरील जलकुंभावर व्हॉल्व व वॉटर मीटर बसविणे, सातपूर प्रभाग क्र. ९, १० मधील कार्बन नाका परिसर, अशोक नगर येथे ९०० मि.मी. डीआय पाइपलाइनवरील पाणी गळती बंद करणे, हॉटेल रेडिसन ब्लू येथील आनंद नगर टाकीच्या पाइपलाइनवरील पाणी गळती बंद करणे, स्मार्ट सिटी कंपनी मार्फत वासन नगर एरफ, राणीनगर, पाथर्डी फाटा जीएसआर येथील पाइपलाइनवर व्हॉल्व बसविणे व इतर अनुषंगिक कामे करणे, नाशिक रोड विभागातील उपनगर इच्छामणी मंगल कार्यालयाजवळ संजय गांधी नगर रॉ वॉटर पाइपलाइन लिकेज बंद करणे, पवारवाडी जलकुंभ भरणारी उर्ध्ववाहिनी जेलरोड सिग्नलजवळ लिकेज बंद करणे अशी विविध स्वरूपाच्या कामांकरता दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार असल्यामुळे शनिवारी (दि. ३०) संपूर्ण नाशिक शहरास पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. तसेच रविवार, दि. १ डिसेंबर रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे मनपा पाणी पुरवठा विभागाने कळविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news