

नाशिक : जिल्ह्यात पावसाने दमदार सुरुवात केल्यामुळे गंगापूर, दारणा, कडवा, पालखेड आदी धरणांमध्ये जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या या धरणांतून करण्यात आलेल्या विसर्गामुळे आतापर्यंत नांदूरमध्यमेश्वर धरणामार्गे साडेसात टीएमसी (७,७९१ दलघफू) पाणी जायकवाडी धरणाकडे रवाना करण्यात आले आहे.
सध्या गंगापूर धरणात ५९ टक्के जलसाठा शिल्लक असून, गेल्या आठ दिवसांत १८,९७१ क्युसेक्स वेगाने १,६४० दलघफू (दीड टीएमसी) पाणी विसर्ग करण्यात आले आहे. दारणा धरणातून २९,६२९ क्युसेक्स वेगाने २,५६१ दलघफू (अडीच टीएमसी), तर कडवा धरणातून ५,०३५ क्युसेक्स वेगाने ४३५ दलघफू पाणी सोडण्यात आले आहे.नद्यांना आलेल्या पुरामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणातही भरपूर पाणीसाठा निर्माण झाला आहे. यामधून एकूण साडेसात टीएमसी पाणी जायकवाडी धरणात पाठवण्यात आले आहे.
गंगापूर धरणात शिल्लक जलसाठा - 59 टक्के
आजचा शिल्लक जलसाठा - 3332 दलघफू
मागील वर्षी शिल्लक जलसाठा - 955 दलघफू
नाशिकमध्ये गेल्या 24 तासांत पडलेला पाऊस - 8 मिमी
1 जूनपासून आतापर्यंत पडलेला पाऊस - 330 मिमी
दारणा - 3536 क्युसेक्स
गंगापूर - 1760 क्युसेक्स
कडवा - 795 क्युसेक्स
होळकर ब्रीज - 2881 क्युसेक्स
नांदुरमध्यमेश्वर - 15775 क्युसेक्स
पालखेड - 4338 क्युसेक्स
आठवड्याभरापूर्वी गंगापूर धरणात ६५ टक्के जलसाठा होता, मात्र पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे तो ५९ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गेल्या वर्षी याच वेळी हा साठा फक्त २७ टक्के (९५५ दलघफू) होता. नाशिकमध्ये १ जूनपासून आतापर्यंत ३३० मिमी पावसाची नोंद झाली असून, मागील २४ तासांत ८ मिमी पाऊस पडला आहे.