Trimbakeshwar Temple VIP Darshan | त्र्यंबकेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात व्हीआयपी दर्शन बंद; देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय!

Trimbakeshwar Temple VIP Darshan | जिल्हाधिकारी तसेच केंद्र व राज्य स्तरावरून पत्र घेऊन येणाऱ्यांना सवलत
Trimbakeshwar Temple
Trimbakeshwar Temple Pudhari File Photo
Published on
Updated on

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा
आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात व्हीआयपी दर्शन बंद करत असल्याचे पत्र देवस्थान ट्रस्टचे चेअरमन सहधर्मदाय आयुक्त यांनी काढले आहे. तथापि या पत्रामध्ये अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी केंद्रीय स्तरावरून या राज्य स्तरावरून तसेच जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्राप्त होणाऱ्या राज शिष्टाचारासंबंधी लेखी पत्रव्यवहाराच्या व्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारचे व्हीआयपी दर्शन गुरुवार (दि. १३) पासून बंद केल्याचे नमूद केले आहे.

Trimbakeshwar Temple
Nashik Nanduri highway Updates |नाशिक-नांदुरी रस्ता रुंदीकरणाच्या कामाला वेग; कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून थेट पाहणी

दर्शनाच्या नियोजनाचे पत्र शासनाच्या ३१ विभागांना आणि इतर सर्व शासकीय व निमशासकीय संस्थांना दिले आहे. शासकीय विभागाकडून येणाऱ्या अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या संख्येमध्येही विभागावर मर्यादा निश्चित केली असून, त्यानुसार दैनंदिनरीत्या फक्त सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री ८ या निश्चित वेळेतच फक्त २० अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची दर्शनव्यवस्था श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात येईल, असे नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news