

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आदिवासींच्या न्याय्य हक्कांचे प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेले राज्य सरकार आपले नाकर्तेपण लपवण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर विनाकारण खापर फोडत आहे, असा थेट हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
नाशिक येथे आपल्या विविध मागण्यांसाठी एल्गार पुकारणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी भेट दिल्यानंतर वडेट्टीवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर चौफेर टोलेबाजी करत सडकून टीका केली.
नाशिकमध्ये सुरू असलेल्या आदिवासी विद्याथ्र्याच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत वडेट्टीवार म्हणाले की, लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकारही हिरावून घेतला जात आहे. सरकार या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची यादी तयार करून त्यांना तडीपार करण्याचा कट रचत असून, अत्यंत जुलमी पद्धतीने आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे." इतके दिवस है तरुण रस्त्यावर बसले आहेत, पण एकही मंत्री किंवा मुख्यमंत्री त्यांची दखल घ्यायला आला नाही.
पळपुटे सरकार बिळात लपून बसले असून, फडणवीस सरकारला आता पाण्यातही संताजी धनाजीप्रमाणे राहुल गांधीच दिसतात," असा जोरदार टोला त्यांनी लगावला. कुंभमेळ्याच्या ३५ हजार कोटींच्या उथळपट्टीवरून सरकारच्या तिजोरीतील पैशांच्या वाटपावर प्रश्न उपस्थित करताना ते म्हणाले, "कुंभमेळ्यासाठी सरकारकडे ३५ हजार कोटी रुपये उधळायला आहेत, पण आदिवासी तरुणांच्या भविष्यासाठी आणि शिक्षणासाठी पैसे नाहीत.
काँग्रेसच्या काळातही कुंभमेळा आणि चारधाम यात्रा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्या. हा सोहळा ५ ते १० हजार कोटींत सहजरीत्या पार पड्डू शकला असता. पण कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी ३५ हजार कोटीचा चुराडा केला जात आहे. यातले १० ते १५ हजार कोटी जर आदिवासी समाजाच्या विकासावर सार्च केले असते, तर आज हा समाज सरकारच्या पाठीशी उभा राहिला असता.
मनुवाद लादण्याचा सरकारचा प्रयत्न
शिक्षणावरील घसरत्या खर्चाबाबत चिंता व्यक्त करत वडेट्टीवार म्हणाले की, राजीव गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात शिक्षणावर ३.७ टक्के खर्च केला जात होता, तो आता १.७टक्क्यांवर आणला गेला आहे. शिक्षणावरील बजेट कापून मनुवादाच्या आधारे देश चालवण्याचा आणि एकूणच शिक्षणव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा विडा सरकारने उचलल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला,
आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूला सरकारच जबाबदार
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या दोन वर्षांत तब्बल साडेपाचशेहून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, या नरसंहाराला थेट राज्य सरकार, आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक ऊईके, सचिव आणि आयुक्तच जबाबदार आहेत. या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून डॉ. ऊईके यांनी पदाचा राजीनामा द्यावा, असा घणाघाती हल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चढवला. नाशिकमध्ये आदिवासी आयुक्तालय असल्याने राज्य सरकारने याच ठिकाणी स्वतंत्र मंत्रिमंडळाची बैठक घेत आदिवासी बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांची उकल करावी, अशी आक्रमक मागणीही त्यांनी यावेळी केली.
नाशिकमध्ये मंगळवारी (दि.१) आदिवासी समाजातर्फे आयोजित विराट 'राज्यव्यापी उलगुलान मोर्चा'ला प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला. शासकीय नोकरभरतीच्या बिंदूनामावलीत फडणवीस सरकारने जाणीवपूर्वक आदिवासी समाजाला आठव्या क्रमांकावर ढकलून त्यांच्यावर अन्याय केला आहे. ही बिंदू नामावलीतील त्रुटी तत्काळ दुरुस्त करून आदिवासींना त्यांचा न्याय्य हक्क द्यावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली. प्रशासनात बसून फक्त भ्रष्टाचार करायचा आणि सोशल मीडियावरून लोकशाहीचे धडे द्यायचे, हाच या सरकारचा खरा चेहरा आहे, असा घणाघात त्यांनी केला. सध्या राज्यात 'ओबीसी विरुद्ध मराठा विरुद्ध एनटी' असा वाद पेटवून सरकार 'फोडा आणि राज्य करा'चे गलिच्छ राजकारण खेळत असल्याचा थेट आरोपही सपकाळ यांनी केला.
फडणवीस गझनी; मोदींनी देशाचं वाट्टोळं केलं
मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांच्यावर टीकास्त्र सोहताना सपकाळ म्हणाले की, खोटं बोला आणि रेटून बोला हीच फडणवीसांची कार्यपद्धती झाली आहे. त्यांना विसरण्याचा आजार जडला असून ते 'गड़ानी' झाले आहेत. मी त्यांना 'गेट वेल सून' असा सल्ला देतो. पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना ते म्हणाले की, देशात भ्रष्टाचार, महागाई आणि बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेमुळे जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. पंतप्रधानांच्या धोरणांमुळेच देशाचे पूर्ण वाटोळे झाले आहे. जनतेने आता मोदींचा फोटो मनातून कायमचा काढून टाकला आहे. गोंधळ आणि भ्रष्टाचार हेच या सरकारचे ब्रीदवाक्य बनल्याचे त्यांनी सांगितले.
आदिवासींना त्यांचा न्याय्य हक्क द्यावा, अशी मागणी सपकाळ यांनी केली. प्रशासनात बसून फक्त भ्रष्टाचार करायचा आणि सोशल मीडियावरून लोकशाहीचे धडे द्यायचे, हाच या सरकारचा खरा चेहरा आहे, असा घणाघात त्यांनी केला. सध्या राज्यात 'ओबीसी विरुद्ध मराठा विरुद्ध एनटी' असा वाद पेटवून सरकार 'फोडा आणि राज्य करा'चे गलिच्छ राजकारण खेळत असल्याचा थेट आरोपही सपकाळ यांनी केला.
आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
पुण्यात राहुल गांधी यांनी 'छात्रों की गूंज' कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला होता. नागपूर, छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरात पेटलेल्या या आंदोलनाला आणि आदिवासी बांधवांच्या उलगुलान मोर्चाला काँग्रेस पक्षाचा पूर्ण आणि सक्रिय पाठिंबा आहे, असे स्पष्ट करत सपकाळ यांनी सरकारविरोधात आक्रमक लढा उभारण्याचा इशारा दिला.
फडणवीस गझनी; मोदींनी देशाचं वाट्टोळं केलं
मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांच्यावर टीकास्त्र सोहताना सपकाळ म्हणाले की, खोटं बोला आणि रेटून बोला हीच फडणवीसांची कार्यपद्धती झाली आहे. त्यांना विसरण्याचा आजार जडला असून ते 'गड़ानी' झाले आहेत. मी त्यांना 'गेट वेल सून' असा सल्ला देतो. पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना ते म्हणाले की, देशात भ्रष्टाचार, महागाई आणि बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेमुळे जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे. पंतप्रधानांच्या धोरणांमुळेच देशाचे पूर्ण वाटोळे झाले आहे. जनतेने आता मोदींचा फोटो मनातून कायमचा काढून टाकला आहे. गोंधळ आणि भ्रष्टाचार हेच या सरकारचे ब्रीदवाक्य बनल्याचे त्यांनी सांगितले.