वणीत दोन दिवसांपासून वाहने जागेवरच ; आदिवासींचा रास्तारोको

आंदोलनामुळे पोलिसांची दमछाक
Vani Rasta roko aandolan
वणीत दोन दिवसांपासून वाहने जागेवरचpudhari photo
Published on
Updated on

वणी : वणी येथे सुरू असलेल्या चक्का जाम रास्ता रोको आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून वाहतूक ठप्प झाली आहे. वणी बसस्थानक चौफुलीवर दि. २२ ऑगस्ट पासून बेमुदत चक्का जाम रास्तारोको सुरू आहे. या आंदोलनामुळे या परिसरात वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक वाहतुकीचे ट्रक कंटेनर या ठिकाणी वाहतुकीत अडकले आहे. काही वाहने बसस्थानकात लावून देण्यात आली आहे. ट्रान्सपोर्ट चा माल अडकून पडला असून वाहन चालकांची गैरसोय होऊ लागली आहे. दोन दिवस वाहने जागेवरून हललेली नाही त्यामुळे आमच्या अडचणी शासनाने समजून घ्यावा अशी विनंती वाहन चालकांनी केली आहे.

तर दुसरीकडे, सकल आदिवासी समाजाचा रास्तारोको सुरू असल्याने आंदोलक ऊन- वारा पावसाची तमा न बागळता ठिय्या मांडून बसले आहे. या आंदोलनात वयोवृद्ध महिलांचा सुध्दा समावेश आहे. दि. २२ ऑगस्टपासून रात्र -दिवस आंदोलन सुरू आहे. अनेकदा जोरदार पाऊस आला तरी आंदोलक हटले नाही. आंदोलनात सहभागींनी शिधापाणी आणलेला होता. रात्री या ठिकाणी मनोरंजन साठी कार्यक्रम केला. दरम्यान दि. २३ ऑगस्ट रोजी आंदोलकांची संख्या वाढली असून येथेच जेवण तयार करण्यात आले. काल पासुन सुरू असलेल्या आंदोलनामुळे पोलिसांची दमछाक झाली. बंदोबस्तासाठी पोलिसांनी राखीव दलाच्या काही तुकड्या तैनात केल्या आहे. जो पर्यंत या बाबत काही वाटा घाटी करत नाही तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. असे आंदोलक ठाम असल्याचे दिसून आले. काही रस्त्याने लोक मार्ग काढत होते. ते ही बंद करावे यासाठी आंदोलक ग्रामपंचायत समोर बसले. त्या ठिकाणी घोषणा बाजी सुरू केली .तात्काळ वणी पोलिसांनी आंदोलकांची समजुत काढून मुळ आंदोलनाच्या ठिकाणी आणले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news