Nashik Vani Gas Consumer Complaints|वणीत गॅस ग्राहकांनी मांडल्या तक्रारी

वणीत गॅस ग्राहकांनी मांडल्या तक्रारी
वणी : इंडेन गॅस या ठिकाणी पुरवठा निरीक्षण अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी ग्राहकांनी तक्रारींचा पाढा वाचला. (छाया : अनिल गांगुर्डे)
वणी : इंडेन गॅस या ठिकाणी पुरवठा निरीक्षण अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी ग्राहकांनी तक्रारींचा पाढा वाचला. (छाया : अनिल गांगुर्डे)
Published on
Updated on

वणी : वितरण कारभाराविरोधात वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी अक्षय लोहारकर यांनी सहकाऱ्यांसह अचानक भेट देत प्रत्यक्ष चौकशी केली. यावेळी उपस्थित ग्राहकांनी आपल्या तक्रारींचा अक्षरशः पाढाच अधिकाऱ्यांसमोर वाचला. गेल्या दोन आठवड्यांपासून संबंधित गॅस वितरकाविरोधात ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत होत्या. फोनवरून तसेच प्रत्यक्ष भेटून ग्राहकांनी दिंडोरी पुरवठा कार्यालयात नाराजी व्यक्त केली होती. त्यानुसार परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी वितरण केंद्राला भेट दिली.

यावेळी अधिकाऱ्यांनी वितरक व तक्रारदार ग्राहक यांची समोरासमोर चर्चा घडवून आणली. काही ग्राहकांना फोनवरून संपर्क साधूनही त्यांचे म्हणणे जाणून घेतले, केंद्रात उपस्थित असलेल्या ग्राहकांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या. तसेच वितरण केंद्रातील नोंदी, ग्राहक तक्रार पुस्तिका, एजन्सीची कागदपत्रे, वितरण रजिस्टर यांची तपासणी करण्यात आली. वितरण कार्यालय, प्रत्यक्ष वितरणाचे ठिकाण तसेच गॅस गोदामालाही अधिकाऱ्यांनी भेट दिली.

ग्राहकांनी मांडलेल्या तक्रारींमध्ये नोंदणीसाठी तब्बल ४५ दिवसांचा कालावधी, त्यानंतरही १० ते १५ दिवस सिलिंडर न मिळणे, डीएसी नंबर उशिरा मिळणे, खेड्यांमध्ये वितरणासाठी गाड्या न पोहोचणे, पुरेशा टाक्यांचा अभाव आदी मुद्यांचा समावेश होता. याशिवाय वितरण कार्यालय व ठिकाण वारंवार बदलत असल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय होत असल्याचेही सांगण्यात आले.

ग्राहकांच्या साक्षीसह नवीन तक्रारी नोंदवून घेतल्या असून, संबंधित नोंदींची पडताळणी केली आहे. आजच्या तपासणीचा अहवाल व तक्रारी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तसेच जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठवून पुढील कार्यवाही करण्यात येईल.

- अक्षय लोहारकर, पुरवठा निरीक्षण अधिकारी

कंपनीकडून मागणीपेक्षा कमी गॅस पुरवठा होत असल्याने ग्राहकांना वेळेत सिलिंडर देणे कठीण होत आहे. शासकीय नियमांनुसार ४५ दिवसांचा प्रतीक्षा कालावधी असून, प्रत्यक्ष पुरवठा कमी पडत आहे. कंपनीकडून लवकरच पुरवठा वाढेल व परिस्थिती सुधारेल

- हेमंत बोथरा, वणी इंडेन गॅस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news