Ustad Zakir Hussain Passed Away : वादनातील 'उस्ताद', प्रेमळ माणूस गमावला

कलाकारांनी दिला झाकीर हुसेन यांच्या स्मृतींना उजाळा
नाशिक
नाशिकचे सुहास जोशी यांनी काढलेले नयनरम्य असे झाकीर हुसेन यांचे रेखाचित्रPudhari News network
Published on
Updated on

नाशिक : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तबलावादक झाकीर हुसेन यांचे नाशिकमध्ये सोलो वादनासह अनेक मैफलींचे कार्यक्रम झाले होते. त्याच्यासोबत नाशिककर कलावंताच्या आठवणी अत्यंत हृदय आहेत. हुसेन अत्यंत प्रेमळ व्यक्तीमत्व हाेते. कलाविष्काराचा आनंद सामान्यांना अनुभवायला मिळावा, म्हणून ते कार्यक्रमाचे तिकीट दर अत्यंत कमी ठेवण्यास सांगत. इतके मोठे कलावंत असूनही त्यांना यत्किंचितही अभिमान, गर्व नव्हता. त्याच्या जाण्याने संवेदशीनशील, प्रेमळ 'जिंदादिल' माणूस आणि कलावंत गमावला, अशा शब्दात संगीत क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. (Zakir Allaraka Qureshi was born on 9 March 1951 in present-day Mumbai, Maharashtra, India to tabla master)

झाकिर हुसेन अत्यंत प्रेमळ आणि दिलखुलास व्यक्तीमत्व. त्याच्या प्रेमळ स्वभावाने ते सर्वांनाच आपलेसे वाटत. २००४ मध्ये माझी मुलगी गंभीर आजाराने ग्रस्त होती. तेव्हा तिला कलिदासच्या ग्रीनरुममध्ये हुसेन साहेंबांना भेटण्यास नेले असता त्यांनी त्यांच्या गुरुंची रक्षा (उदी) मुलीच्या अंगाला लावली. ही सिद्ध उदी असून नियमीत लावत जा असेही सांगितले. त्यानंतर मुलीसाठी १० मिनीटे ध्यान लावून बसले आणि ती पूर्ण बरी होईल, असा आर्शीवादही दिला. एकदा ते नाशिकला आले असता त्यांनी नागलीचे पापड नेले होते.

प्रशांत जुन्नरे, बाबाज् थिएटर्स, नाशिक

'श्याम रंग' कार्यक्रमासाठी उस्ताद हुसेन साहेब नाशिकला आले असता त्यांना मानधनाचे पाकीट सन्मानपूर्वक देऊ केले होते. त्यांनी ते नम्रपणे नाकारत हे वादन मी अभिषेकी यांच्या स्मृतींना वंदन म्हणून केले, त्याचे मानधन मी स्वीकारु शकत नाही. सांस्कृतिक कार्यक्रम करायला मोठा खर्च येतो हे मी जाणतो, असे सांगून त्यांनी व्यावसायिक कलावंत असूनही मानधन नम्रपणे नाकारले होते. पूढे ते मानधन आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचवले परंतु इतका नम्र, मोठा कलावंत पुन्हा होणे नाही.

मकरंद हिंगणे, गायक, नाशिक.

नाशिकचे पराग वेलणकर उस्ताद अल्लाॅ रक्खा यांच्ये शिष्य. यांच्यासाठी कमिशन वर्क म्हणून १० वर्षांपूर्वी झाकीर हुसेन यांचे व्यक्तिचित्र काढले होते. हुसेन यांची तबलावादनाची एकही मैफल एेकण्याची संधी सोडली कधीच सोडली नाही. जागतिक र्कीतीचा हा कलावंत अत्यंत नम्र आणि साधा होता हे जवळून अनुभवले.

सुहास जोशी, चित्रकर्ती, नाशिक.

दरवर्षी प्रत्येक फ्रेबुवारीमध्ये झाकीर हुसेन साहेब महाराष्ट्रात कार्यक्रमांसाठी तारखा देत. ज्या ठिकाणी मी पाेहचलो नाही तिथे कार्यक्रम ठेवाण्यावर त्यांचा भर असे. सामान्य व्यक्तींना कलाविष्काराच आनंद मिळावा म्हणून त्यांनी स्वत:च्या कार्यक्रमाचे तिकीट दर ३०० रुपयांच्या वर नसावे असे ते सांगत. जर कार्यक्रमातून रक्कम जमा झाली नाही तर मला मानधन देऊ नका असे ते म्हणत. असामान्य प्रतिभेचा इतका विनम्र माणूस मी कधीही पाहिला नाही.

जयप्रकाश जातेगावकर, ग्रंथसचिव, सावाना, नाशिक.

१०० वर्षांतून एक असा कलाकार जन्माला येतो. झाकीर हुसेन यांना ३-४ वेळेस कार्यक्रमाच्या आधी ग्रीन रूममध्ये जवळून पाहण्याचा योग आला. प्रचंड उर्जावान वादक, त्यांचा वावर, आर्टिस्टची बोलण्याची लकब अत्यंत नम्र होती. आमचे सर्वांचे दैवत आता दिसणार नाही यावर विश्वास बसत नाहीये.

नितीन पवार, तबला वादक, नाशिक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news