Unseasonal rain Nashik | सिन्नरला ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; मे महिन्यात नदीला पूर

Nashik News नदी-नाल्यांना पूर; रस्ते जलमय, जनजीवन विस्कळीत; अवघ्या दोन तासांत १४४ मिमी पाऊस
सिन्नर (नाशिक)
सिन्नर शहरातून वाहणाऱ्या सरस्वती नदीला आलेला पूर (छायाचित्रे : संदीप भोर)
Published on
Updated on

सिन्नर (नाशिक): शहर परिसरात रविवारी (दि. २५) ढगुटीसदृश पावसाने हाहाकार माजवला. देवनदी, शिवनदी, सरस्वती या नद्यांसह नाल्यांना पूर येथून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Summary

रविवारी (दि. २५) दुपारी साडेतीन ते पावणेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर चाललेल्या पावसाने शहराला जोडणाऱ्या रस्त्यांवर माेठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे दळणवळण ठप्प झाले. अवघ्या दोन तासांत १४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती तहसील कार्यालयाने दिली आहे.

शहर व उपनगरांतील रस्ते जलमय झाले. विजयनगरच्या सखल भागातील घरात पाणी शिरले. सरदवाडी राेड परिसरातील उपनगरांना जोडणाऱ्या रस्त्यांवरही हीच परिस्थिती हाेती. नायगाव राेड भागातदेखील रस्त्यांवरुन पाणी वाहत हाेते. शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या गणेशपेठेतून पाण्याचे लाेट वाहत हाेते.

शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या सरस्वती नदीला पहिल्याच पावसात पूर आला. पडकी वेससह नवापूलावरुन पाणी वाहत हाेते. एकूणच मुसळधार पावसामुळे जनजीवन प्रभावित झाले. सायंकाळच्या सुमारास पावसाने उघडीप दिली.

सिन्नर (नाशिक)
मुसळधार पावसामुळे देव नदीवरील कुंदेवाडी येथील ओसंडून वाहणारा बंधारा. Pudhari News Network
सिन्नर (नाशिक)
Nashik Rain : मुसळधार पावसात सिन्नर बसस्थानकाचे छत काेसळले
सिन्नर (नाशिक)
ठाणगाव सिन्नर मार्गावर डुबेरे जवळ पिकप वाहनावर कोसळलेले बाभळीचे झाड.Pudhari News Network

झाड उन्मळले; वाहतुकीचा खोळंबा

दरम्यान, मुसळधार पावसात सिन्नर - डुबेरे रस्त्यावर सायंकाळी सातच्या सुमारास बाभळीचे झाड उन्मळून एका पिकपवर कोसळले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सिन्नर- ठाणगाव हा रस्ता अतिशय वर्दळीचा असून वाहतुकीचा मात्र खोळंबा झाला. रात्री उशिरापर्यंत झाड बाजूला करण्याचे काम सुरू होते.

सिन्नर (नाशिक)
सिन्नर ठाणगाव रस्ता पाण्याखाली.Pudhari News Network

देवनदीला पूर

जवळपास दोन तास मुसळधार पाऊस झाला. त्यातून नाले दुथडी भरून वाहू लागले. देवनदीला मात्र पूर आलेला बघायला मिळाला. ठाणगाव, कुंदेवाडी, मुसळगाव येथील पुलावरून पाणी वाहिले. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुक ठप्प झाली होती.

सिन्नर (नाशिक)
सिन्नर शहरातील उपनगरांमध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले विजयनगर भागात रहिवाशांच्या घरात पावसाचे पाणी शिरले.Pudhari News Network

ठाणगाव परिसरात मुसळधार

ठाणगाव परिसरात तसेच उंबरदरी धरणाच्या क्षेत्रात रविवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे धरणात पाण्याची आवक झाली. डोंगरदर्‍यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना दिसून आले.

सिन्नर (नाशिक)
अवकाळीने गावांना चांगलेच पावसाने झोडपले आहे. Pudhari News Network

या गावांना पावसाने झोडपले

तालुक्यातील ठाणगाव, पाडळी सह परिसर, सोनांबे, कोनांबे शिवार, दापूर, चापडगाव, नायगाव, विंचूर दळवी, पांडुर्ली, डुबेरे, आटकवडे या गावांना पावसाने चांगले झोडपले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news