Uddhav Thackeray in Nashik | उद्धव ठाकरेंची आज नाशिकमध्ये
नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.16) नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्राचे विभागीय शिबिर होत आहे. या माध्यमातून संघटना बळकटीकरणासह आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल ठाकरेंकडून फुंकला जाणार आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सैरभैर झालेल्या शिवसैनिकांमध्ये नवा उत्साह निर्माण करून शिवसेनेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास उबाठाचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
गोविंदनगर येथील मनोहर गार्डनमध्ये सकाळी ९ वाजता युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होईल. तर सायंकाळी ६.३० वाजता उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने शिबिराचा समारोप होणार आहे. खा. राऊत यांनी मंगळवारी या शिबिराच्या तयारीचा आढावा घेतला. शिबिराची तयारी पूर्ण झाली असून, वातावरणनिर्मितीसाठी शालिमार येथील शिवसेना कार्यालयातून सायंकाळी मशाल रॅली काढण्यात आली.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेने (उबाठा)चे उत्तर महाराष्ट्राचे विभागीय शिबिर बुधवारी (दि.१६) नाशिकला होत आहे. या शिबिराच्या माध्यमातून संघटना बळकटीकरणासह आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल ठाकरेंकडून फुंकला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सैरभैर झालेल्या शिवसैनिकांमध्ये नवा उत्साह निर्माण करून शिवसेनेला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास उबाठाचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
गोविंदनगर येथील मनोहर गार्डनमध्ये सकाळी ९ वाजता युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होईल. तर सायंकाळी ६.३० वाजता उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने शिबिराचा समारोप होणार आहे. खा. राऊत यांनी मंगळवारी या शिबिराच्या तयारीचा आढावा घेतला. शिबिराची तयारी पूर्ण झाली असून, वातावरणनिर्मितीसाठी शालिमार येथील शिवसेना कार्यालयातून सायंकाळी मशाल रॅली काढण्यात आली. दरम्यान, हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे यापूर्वी कधी न एेकलेले भाषण ऐकण्याची संधी या शिबिराच्या माध्यमातून शिवसैनिकांना लाभणार आहे. एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ही किमया घडविली जाणार आहे. या भाषणाचे प्रात्यक्षिकही मंगळवारी उबाठा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. दरम्यान, बुधवारी दिवसभर चालणाऱ्या या शिबिरात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना उबाठासाठी कायदेशीर लढाई लढणारे ॲड. असीम सरोदे यांचेही मार्गदर्शन होणार आहे. शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत तसेच विनायक राऊत, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे हेही या चर्चासत्रांच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील.
असे आहे शिबिराचे नियोजन
सकाळी ९ वाजता शाहिरी कार्यक्रमानंतर १० वाजता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन होईल.
त्यानंतर सकाळी १० ते ११ या दरम्यान 'आम्ही शिवसेनेत का?' यावर खा. अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, खा. राजाभाऊ वाजे, राजन विचारे यांचे चर्चासत्र होईल.
सकाळी ११ ते १२ या दरम्यान 'महाराष्ट्र कुठे चाललायं?' यावर आदित्य ठाकरे मार्गदर्शन करतील.
दुपारी १२ ते १ दरम्यान विनायक राऊत हे 'बूथ व्यवस्था व मतदानयादी' यावर मार्गदर्शन करतील.
दुपारी २ ते ३ या दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे 'संघटनेचा आत्मा व पुनर्बांधणी' यावर मार्गदर्शन होईल. त्यानंतर 'खोटे खटले, फेक नरेटिव्ह व महाराष्ट्रापुढील समस्या' यावर ॲड. असीम सरोदे मत मांडतील. त्यानंतर शिवशाही स्वप्निल डुंबरे यांचा शाहिरी कार्यक्रम होईल.
खा. संजय राऊत यांचे सायंकाळी ६ वाजता, तर उद्धव ठाकरे यांचे ६.३० वाजता प्रमुख भाषण होणार आहे.
