UBTHA Shiv Sena Protest | "उबाठाची रस्त्यावरील खड्ड्यांत बसून निदर्शने! नाशिकमध्ये 'खड्डेमुक्त महापालिका' अभियानाला सुरुवात"

UBTHA Shiv Sena Protest | 'उबाठा'ची रस्त्यावरील खड्ड्यांत बसून निदर्शने
Shiv Sena UBT
शिवसेना (उबाठा) गटात राडाPudhari file photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांच्या समस्यसह नाशिक महापालिकेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने 'खड्डेमुक्त महापालिका' अभियान सुरू केले आहे. शहरातील विविध भागांतील रस्त्यांची दुरावस्था, विकासकामांतील कथित अनियमितता आणि आर्थिक कारभारातील पारदर्शकतेच्या मुद्द्यावर पक्षाने आक्रमक भूमिका घेत दोषींवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Shiv Sena UBT
Sindhudurg News : पावणेतीन लाखांच्या गोवा दारूसह कार जप्त

शालिमार चौकात रस्त्यावरील खड्ड्यात बसून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी खड्ड्यांविरोधात स्वाक्षरी मोहीमही राबवण्यात आली. पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, नाशिक शहरासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होऊनही नागरिकांना दर्जादार रस्ते मिळाले नाहीत.

उलट नाशिकरोड, पंचवटी, सिडको, सातपूर तसेच पूर्व व पश्चिम विभागातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली

Shiv Sena UBT
शिवसेना धुळे जिल्हा पदाधिकारी नियुक्त्या जाहीर; तीन जिल्हाप्रमुख तर दोन महानगरप्रमुख

गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय राजवटीत महापालिकेचा कारभार सुरू असून, या कालावधीत कथित संगनमतातून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. तसेच आगामी कुंभमेळ्यासाठी मंजूर निधी खर्चातही पारदर्शकता नसल्याचा आरोप करीत, नागरिकांच्या हितापेक्षा आर्थिक व्यवहारांना प्राधान्य दिले जात असल्याचा दावा करण्यात आला.

शहरातील खड्डे, विकासकामांतील कथित अनियमितता आणि भ्रष्टाचाराविरोधात सर्व विभागांमध्ये जनजागृती आणि आंदोलनाची मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली असून, येत्या काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असे शिवसेना जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी यांनी सांगितले.

या अभियानात लोकसभाप्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, मनपा गटनेते केशव पोरजे, युवासेना जिल्हाधिकारी सागर कोकणे, महिला आघाडी जिल्हा संघटक स्वाती पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news