Nashik MD Drugs |नाशिकमध्ये 'एमडी ड्रग्ज' विक्रीचा पर्दाफाश; 2 लाखांच्या मुद्देमालासह दोघांना अटक

Nashik MD Drugs | 2 लाख 14 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त ; म्हसरूळ परिसरात सापळा रचून कारवाई
Arrested
ArrestedPudhari
Published on
Updated on

नाशिक / पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहरात अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात पोलिसांनी कारवाईची तीव्रता वाढविली असून, अमली पदार्थविरोधी पथकाने म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत दोन संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून ४६ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ, मोटारसायकल व इतर साहित्य असा एकूण २ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Arrested
Nashik Municipal Corporation | गणेशोत्सवासाठी नाशिक महापालिका ॲक्शन मोडवर; विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश

दर्शन गोरख गायकवाड (३३, व्यवसाय कुंभारकाम, रा. राम मंदिरामागे, मातोरी गाव, ता. जि. नाशिक) आणि रोशन दिनकर लोखंडे (३२, रा. कोळेवाडी, मातोरी गाव ही ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे होत.
सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील हे पोलिस अंमलदारांसह गुप्त माहितीच्या आधारे गस्त घालत होते. यावेळी म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अश्वमेधनगर, रिक्षा स्टँडसमोर, नामको हॉस्पिटलजवळील मोकळ्या पटांगणात मोटारसायकलवर दोन संशयित आढळून आले.

पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने शिताफीने दोघांना ताब्यात घेत चौकशी केली. ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे दर्शन गोरख गायकवाड (३३, व्यवसाय कुंभारकाम, रा. राम मंदिरामागे, मातोरी गाव, ता. जि. नाशिक) आणि रोशन दिनकर लोखंडे (३२, रा. कोळेवाडी, मातोरी गाव, ता. जि. नाशिक) अशी आहेत.

पंचांसमक्ष झडती घेतली असता दर्शन गायकवाड याच्या पॅन्टच्या खिशात विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले ४६ ग्रॅम एमडी आढळून आले. या अमली पदार्थाची किंमत १ लाख ९२ हजार ५०० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच मोटारसायकल व इतर साहित्य असा एकूण २ लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Arrested
Pune Nashik highway traffic update: चाकणमध्ये भीषण वाहतूककोंडी; पुणे-नाशिक महामार्गावर ५ ते ७ किलोमीटर वाहनांच्या रांगा

दोन्ही आरोपींविरुद्ध म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अमली पदार्थाचा स्रोत कोणता आणि तो कोणाला विक्री करण्यासाठी आणला होता, याचा तपास अमली पदार्थविरोधी पथकाकडून सुरू आहे. दर्शन गोरख गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. तो १७ एप्रिल २०२६ रोजी जेलमधून जामिनावर बाहेर आला होता.

या कारवाईत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन चौधरी, विशाल पाटील, श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, संजय ताजणे, देवकिसन गायकवाड, भरत डंबाळे, संतोष सौंदाणे, बाळासाहेब नांद्रे, योगेश सानप, चंद्रकांत बागडे, गणेश वडजे, अर्चना भट यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news