

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेंतर्गत शुक्रवारी (दि. १०) सायंकाळी ६ पर्यंत १ लाख ६१ हजार ६१२ अर्जांचे वितरण करण्यात आले. गेल्या १० दिवसांत २० लाख अर्ज घरोघरी जाऊन वितरित करण्यात आले.
जिल्ह्यातील ५१ लाख ४ हजार ४५८ मतदारांपैकी ४० टक्के मतदारांपर्यंत अर्ज पोहोचल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली. विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेंतर्गत प्रत्येक मतदारापर्यंत एसआयआरचा अर्ज पोहोचविण्याचे काम बीएलओंकडून सुरू असून, शुक्रवारपासून विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात शनिवार व रविवार या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात अर्ज वितरण व संकलन होऊन जिल्ह्यातील कामकाज ५० टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास निवडणूक विभागाने व्यक्त केला आहे. दि. ३१ जुलैपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.
एसआयआरसाठी विविध राजकीय पक्षांनी आतापर्यंत १४ हजार ४९८ बीएलए उपलब्ध करून दिले आहेत. यात सर्वाधिक ४,५३४ बीएलए शिवसेना (ठाकरे गट), त्यानंतर भाजपने ३,४५१, शिवसेना (शिंदे गट) ३,४३०, काँग्रेसने १,०८९, राष्ट्रवादीने १,७१५, राष्ट्रवादी शरद पवार गटाने २७८, बसपा ९ यांचा समावेश आहे. मनसेने अद्याप एकही बीएलए उपलब्ध करून दिलेला नाही.
मतदारसंघवितरित अर्जनाशिक पश्चिम१८,२६१येवला१४,६८६कळवण१४,६०१चांदवड१४,१५४निफाड१३,१०४दिंडोरी१२,५००सिन्नर१०,५३१मालेगाव बाह्य१०,०४२इगतपुरी९,२३९नांदगाव८,८६८नाशिक पूर्व८,८२३बागलाण८,६५६नाशिक मध्य६,९७७देवळाली६,९४१मालेगाव मध्य४,२२१ एकूण१,६१,६१२