Trimbakeshwar Temple | त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंगची सोय करणार

भाविकांची गैरसोय टळणार : लवकरच संकेतस्थळ होणार कार्यान्वित
Trimbakeshwar Temple
त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंगची सोयFile Photo
देवयानी ढोन्नर

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी लागणाऱ्या भाविकांच्या लांबच लाब रांगा, त्यातून होणारा वेळेचा अपव्यय तसेच वाद टाळण्यासाठी भाविकांना दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंगची सोय केली जात असून, ही सुविधा लवकर सुरू होणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी, सहधर्मादाय आयुक्तांकडून करण्यात आलेल्या सूचनेनुसार देवस्थान ट्रस्टकडून याबाबत तयारी केली जात आहे.

आगामी काळात श्रावण महिना तसेच विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने देवस्थानाकडून तयारी केली जात आहे. विश्वस्त मंडळाकडून भाविकांची दर्शनासाठी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी नियोजन केले जात आहे. विशेषत: दोनशे रुपये दर्शनबारीची क्षमता वाढविली जात आहे. तसेच दर्शनबारीत अधिक वेळ थांबावे लागल्यास लहान मुले, वयोवृद्धांना बसण्यासाठी सुविधा निर्माण केली जात आहे. येत्या आठ-दहा दिवसांत याबाबतची प्रस्तावित काम पूर्ण होतील, अशी माहिती विश्वस्त कैलास घुले यांनी दिली आहे.

संकेतस्थळाचे काम अंतिम टप्प्यात

पूर्व दरवाजा धर्मदर्शन रांग आणि दोनशे रुपये देणगी दर्शनबारी या दोन्हींसाठी येत्या पंधरा दिवसांत ऑनलाइन बुकिंग सुविधा कार्यान्वित होईल. यासाठी ट्रस्टचे अधिकृत संकेतस्थळाचे काम पूर्णत्वास आले असून, भाविकांना दर्शनाची वेळ ऑनलाइन पद्धतीने बुक करता येणार आहे. तसेच मोफत अथवा सशुल्क अशा दोन्ही दर्शनांसाठी ऑनलाइन बुकिंग करून भाविक दर्शनाचा लाभ घेऊ शकतील. त्यामुळे तासन्तास रागंते उभे राहण्याची गरज राहणार नसल्याचे विश्वस्त मनोज थेटे यांनी सांगितले.

तत्काळ दर्शनासाठी 2500 रुपये

दर्शनाच्या नावाने व्यवसाय होतो. भाविकांकडून 2 ते 5 हजार रुपये उकळले जातात, असे आरोप झाल्याने याबाबत जिल्हाधिकारी व धर्मादाय आयुक्त कार्यालयाने गंभीर दखल घेत ट्रस्टने अधिकृत 2500 रुपये देणगी पावती करावी आणि तत्काल दर्शन द्यावे, अशा सूचना व्यवस्थापनाला केल्या आहेत. त्यानुसार व्यवस्था केली जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news