Kumbh Mela 2027 | त्र्यंबकेश्वरला हेलिकॉप्टरने दर्शन घेण्याची योजना फसली? प्रशासनासमोर मोठे आव्हान

Kumbh Mela 2027 | त्र्यंबकेश्वर येथे तीन हेलिपॅड उभारून खासगी हेलिकॉप्टर ऑपरेटर्सच्या माध्यमातून २ नोव्हेंबरपासून सशुल्क दर्शन सेवा सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते.
Kumbh Mela 2027
Kumbh Mela 2027
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि भाविकांना अल्पावधीत त्र्यंबकेश्वर दर्शन घडविण्यासाठी आखलेली हेलिपोर्ट सेवा प्रत्यक्षात सुरू होण्यापूर्वीच अडचणीत सापडली आहे. त्र्यंबकेश्वर येथे तीन हेलिपॅड उभारून खासगी हेलिकॉप्टर ऑपरेटर्सच्या माध्यमातून २ नोव्हेंबरपासून सशुल्क दर्शन सेवा सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते.

Kumbh Mela 2027
Nashik Municipal Corporation | सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली अडीच कोटींची कामे विनानिविदा; नाशिक महापालिकेचा निर्णय चर्चेत

मात्र, ही तारीख उलटूनही सेवा सुरू झालेली नाही. विशेष म्हणजे, प्रशासनाकडून खासगी विमान कंपन्या आणि हेलिकॉप्टर ऑपरेटर्सना प्रस्ताव देऊनदेखील कोणत्याही ऑपरेटरने सकारात्मक प्रतिसाद दिलेला नसल्याने संपूर्ण नियोजनच बारगळल्याचे चित्र आहे. सिंहस्थ ध्वजारोहण सोहळा पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे तीन हेलिपॅड विकसित केले होते.

या सुविधेचा उपयोग केवळ राष्ट्रपतींच्या दौऱ्यापुरता मर्यादित न ठेवता भविष्यात धार्मिक पर्यटनासाठी करण्याचा संकल्प प्रशासनाने मांडला होता. मात्र, राष्ट्रपतींनी नाशिक ते त्र्यंबकेश्वर हा प्रवास रस्ते मार्गाने केल्याने या हेलिपॅडचा नियोजित वापर होऊ शकला नाही. त्यानंतर या सुविधेचा व्यावसायिक वापर करण्यासाठी आखलेली हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यातही प्रशासनाला अपयश आले आहे. परिणामी, हेलिपॅड उभारणीवरील खर्च आणि त्यातून अपेक्षित पर्यटन विकास यांचा ताळमेळ साधण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

चार तासांत दर्शनाचे होते नियोजन

प्रशासनाच्या प्रस्तावानुसार मुंबई, नवी मुंबई, पुणे, सुरत, जळगाव, धुळे आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांतून ४० ते ५० मिनिटांत त्र्यंबकेश्वरला पोहोचण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन होते. सहा ते आठ प्रवासीक्षमतेच्या हेलिकॉप्टरमधून भाविकांना आणण्याचा प्रस्ताव होता.

या सेवेसाठी हेलिकॉप्टर प्रवास, त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शन आणि हेलिपॅडपासून मंदिर व कुशावर्त तीर्थापर्यंत स्थानिक वाहनांची व्यवस्था अशा एकत्रित पॅकेजची संकल्पना होती. सुमारे चार तासांत त्र्यंबकेश्वर दर्शन घडविण्याचे नियोजन केले होते. दर्शनासाठी सुमारे अडीच हजार रुपयांच्या प्रवेशपत्रासह संपूर्ण पॅकेज उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव खासगी ऑपरेटर्सना दिला होता. मात्र, या नियोजनाला ऑपरेटर्सकडून प्रतिसाद न मिळाल्याने ही संपूर्ण योजनाच फसली असून, हेलिपॅडचा अडीच कोटींचा खर्चही पाण्यात गेला आहे.

Kumbh Mela 2027
PM Awas Yojana | नाशिक जिल्ह्याची राज्यात मोठी झेप! प्रधानमंत्री आवास योजनेत चौथा क्रमांक

भाविकांची संख्या घटल्याचा परिणाम?

त्र्यंबकेश्वर शहरात सध्या सिंहस्थाची विविध विकासकामे सुरू आहेत. रस्ते, पायाभूत सुविधा आणि अन्य प्रकल्पांच्या कामांमुळे शहरात येणाऱ्या भाविकांना वाहतूक आणि अन्य गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

अशा परिस्थितीत हेलिकॉप्टर सेवा सुरू केल्यास अपेक्षित प्रवासी मिळतील का, याबाबत खासगी ऑपरेटर्समध्ये साशंकता असण्याची शक्यता आहे. परिणामी, प्रशासनाच्या प्रस्तावाला अद्याप कोणत्याही ऑपरेटरकडून हिरवा कंदील मिळालेला नाही. प्रत्यक्ष सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला खासगी कंपन्यांचा सहभागच मिळत नसल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

त्र्यंबकेश्वर हेलिकॉप्टर दर्शन सेवा सुरू होण्याआधीच रखडली; अडीच कोटींचा खर्च पाण्यात?

  1. चार तासांत कुंभमेळ्यातील दर्शनाचे स्वप्न अपूर्ण; हेलिकॉप्टर सेवेला ऑपरेटर्सचा प्रतिसाद नाही

  2. तीन हेलिपॅड उभारले, पण हेलिकॉप्टरच आले नाही! त्र्यंबकेश्वरमधील नेमकं काय घडलं?

  3. २ नोव्हेंबरपासून सुरू होणार होती हेलिकॉप्टर सेवा; तारीख उलटूनही भाविकांची प्रतीक्षा कायम

  4. मुंबई-पुण्याहून अवघ्या ५० मिनिटांत त्र्यंबकेश्वर दर्शन; मात्र योजनेला खासगी कंपन्यांचा नकार

  5. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक पर्यटनाला धक्का? हेलिकॉप्टर दर्शन योजना अडचणीत

  6. अडीच कोटी खर्चून उभारले तीन हेलिपॅड; व्यावसायिक हेलिकॉप्टर सेवा अद्याप बंदच

  7. त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी हेलिकॉप्टर पॅकेजची घोषणा; मग खासगी ऑपरेटर्स का फिरले पाठ?

  8. भाविकांना चार तासांत दर्शन घडवण्याचे नियोजन बारगळले; हेलिपॅडच्या वापरावर प्रश्नचिन्ह

Short English SEO Keywords

Hard SEO English Slug

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.