Nashik Air Pollution | त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्याच्या कामांचा धुरळा; नागरिकांना श्वसनाचे विकार

Nashik Air Pollution | रात्रभर सुरू असलेल्या तोडफोडीचा त्र्यंबकेश्वरकरांना त्रास; धुळीमुळे आरोग्य धोक्यात?
Air Pollution
Air PollutionPudhari
Published on: 
Updated on: 

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर शहरात रात्रीचा दिवस करत कुंभमेळ्याच्या कामाला वेग आला असला तरी विकासकामांची आजची स्थिती केवळ तोडफोडीपुरती मर्यादित आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी सर्वत्र झाकपाक करण्यात आली होती. त्यानंतर पंधरा दिवसांत मेनरोड गंगास्लॅबचे तोडकाम हाती घेण्यात आले.

Air Pollution
Nashik Trimbakeshwar Road | नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गाचे रुंदीकरण वेगात; आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग

अजस्र यंत्रांनी रात्रभर स्लॅब तोडण्याचे काम सुरू आहे. नागरिकांची झोप आता अजस्र यंत्रांनी उडवली आहे. घरांना हादरे देणारे पोकलेन मशिन रात्रभर सुरू असतात. सहा महिन्यांपासून सर्वत्र सुरू असलेली तोडफोड व त्यामुळे निर्माण होणारे धुळीचे लोट यामुळे नागरिकांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. आजच्या घडीला श्वसनाचे आजार जडलेल्या त्र्यंबकवासीयांची संख्या लक्षणीय आहे. वयोवृद्ध आणि पूर्वीपासून आजार असलेल्या रुग्णांची अवस्था दयनीय झाली आहे.

Air Pollution
Trimbakeshwar Temple Security | त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांकडून सुरक्षाक्षक महिलेला मारहाण

नाशिक, पुणे, मुंबई येथे श्वसनाच्या आजारावर सल्ला आणि उपचार घेण्यासाठी सधन नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे; तर गोरगरीब आपल्या परीने उपचारासाठी दूर गेलेल्या सरकारी दवाखान्याच्या रस्त्याने पायपीट करत हेलपाटे मारत आहेत.

विशेष म्हणजे, विकासकामांचा धडाका सुरू झाला असे वातावरण निर्माण झाले आहे; मात्र प्रत्यक्षात केवळ तोडफोड जास्त प्रमाणात आणि सिमेंट, विटा, दगड लावण्याचे काम अत्यल्प प्रमाणात असे चित्र आजही कायम आहे. रहदारीचे आणि बाजारपेठेचे कधीच बारा वाजले असून, आता नागरिकांची रात्रीची झोपदेखील उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.