Trimbakeshwar Municipal Council | 'त्र्यंबक' नाव इतिहासजमा! आता अधिकृतपणे नाव असणार 'त्र्यंबकेश्वर नगर परिषद'; सर्वसाधारण सभेत ऐतिहासिक निर्णय

Trimbakeshwar Municipal Council | सर्वसाधारण सभेत सभागृहाचा ऐतिहासिक निर्णय
Trimbakeshwar Municipal Council
Trimbakeshwar Municipal Council
Published on: 
Updated on: 

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबक नगर परिषद या १७२ वर्षांचा इतिहास असलेल्या नगर परिषदेचे नाव त्र्यंबकेश्वर नगर परिषद असे करण्याचा ऐतिहासिक निर्णय सभागृहाने एकमताने घेतला आहे. नावातील बदलाबाबतची शासनाकडे असलेली प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे.

Trimbakeshwar Municipal Council
Farmers Protest | त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्याने शेतकरी आक्रमक; जव्हार फाट्यावर उद्या रास्ता रोको

त्र्यंबकेश्वर हे सिंहस्थ कुंभमेळ्याचे गाव म्हणून येथे ब्रिटिश सरकारने सन १८५४ मध्ये नगर परिषद स्थापन केली. आद्यज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर, संत निवृत्तीनाथ महाराज संजीवन समाधी आणि ब्रह्मगिरीवर गोदावरीचा उगम आहे. त्यामुळे येथे वर्षभर यात्रा, जत्रा, उत्सव होतात. यासाठी देशभरातील भाविकांची येथे सतत वर्दळ असते.

साहजिकच त्यावेळी लोकसंख्येचा निकष बाजूला ठेवून प्रशासकीय सोयीसाठी येथे नगर परिषद स्थापन केली. त्यावेळी ब्रिटिशांच्या कागदोपत्री त्र्यंबक नगर परिषद असा उल्लेख झाला. स्वातंत्र्यानंतर शासनदरबारी त्र्यंबक हे नाव कायम राहिले. गावाचा उल्लेख त्र्यंबकेश्वर असा होता, तर नगर परिषदेचा त्र्यंबक असा करावा लागतो.

त्र्यंबकेश्वरचे त्र्यंबक हे नाव प्राचीन आहे. अलीकडच्या कालावधीत तेच नाव रूढ झाले आहे. मात्र, सध्याच्या ऑनलाइन युगात माहिती अपलोड करताना याची अडचण होते.
त्र्यंबकेश्वर आणि त्र्यंबक हे दोन्ही एकच आहेत, असे वेळोवेळी निर्देशित करावे लागते. त्यातही त्र्यंबकऐवजी त्र्यंबक असे सहसा लिहिण्यात येते.

यापुढील कालावधीत अशा प्रकारची अडचण वाढत जाणार आहे. या सर्वांचा एकत्रित विचार होऊन नगर परिषदेच्या २८ सप्टेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार यांच्या विशेष प्रयत्नातून गटनेते प्रशांत गायधनी यांच्या संकल्पनेतून व मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्या सल्ल्याने त्र्यंबक असा येथून पुढे उल्लेख न करता तो त्र्यंबकेश्वर नगर परिषद असा अधिकृत ठराव मंजूर केला आहे.

Trimbakeshwar Municipal Council
Eco Friendly Ganpati Decoration | टाकाऊ वस्तूंपासून साकारले हुबेहूब त्र्यंबकेश्वर मंदिर! नाशिकच्या रमेश पवार यांची कल्पकता

त्या नाव बदलाची राजपत्रात सूचना प्रसिद्धीस देणार आहे. यापुढील कालावधीत त्र्यंबक नगर परिषद हे त्र्यंबकेश्वर नगर परिषद असा नावात बदल झाल्याचे जाहीर होऊन सर्वत्र तसे बदल करणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या सर्व सूचना, माहितीपत्रक यावर अधिकृत त्र्यंबकेश्वर नगर परिषद असा उल्लेख पाहावयास मिळणार आहे.

"पत्रव्यवहार करताना तसेच ऑनलाइन माहिती देताना नावातील बदल अडचणीचा ठरत होता. त्यासाठी त्र्यंबक ऐवजी त्र्यंबकेश्वर हे प्रचलित नाव अधिकृत करण्याचा ठराव केला आहे. यापुढील शासकीय प्रक्रिया पूर्ण करून नामफलकावर तसा बदल करण्यात येईल."

- त्रिवेणी तुंगार, नगराध्यक्ष, त्र्यंबकेश्वर नगर परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news