मातृत्वाच्या अनमोल ऋणाला 'पुढारी'चा कृतज्ञ प्रणाम..!

मातृत्वाच्या अनमोल ऋणाला 'पुढारी'चा कृतज्ञ प्रणाम..!
Chitra Wagh |
चित्रा वाघFile Photo
Published on
Updated on
Summary

स्वतःच्या स्वप्नांना बाजूला ठेवून कुटुंबाच्या आनंदासाठी आयुष्य वेचणाऱ्या मातृत्वाला कृतज्ञतेचा मानाचा मुजरा करत दै. 'पुढारी'तर्फे आयोजित 'मातृशक्त्ती पुरस्कार' सोहळा शुक्रवारी (दि. १७) अत्यंत अविस्मरणीय वातावरणात पार पडला. समाजाच्या विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा यथोचित सन्मान भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चित्रा वाघ यांच्या हस्ते करण्यात आला. अत्यंत दिमाखात पार पडलेल्या या सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली.

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्वतःच्या स्वप्नांना बाजूला ठेवून कुटुंबाच्या आनंदासाठी आयुष्य वेचणाऱ्या मातृत्वाला कृतज्ञतेचा मानाचा मुजरा करत दै. 'पुढारी'तर्फे आयोजित 'मातृशक्त्ती पुरस्कार' सोहळा शुक्रवारी (दि. १७) अत्यंत अविस्मरणीय वातावरणात पार पडला. समाजाच्या विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा यथोचित सन्मान भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चित्रा वाघ यांच्या हस्ते करण्यात आला. अत्यंत दिमाखात पार पडलेल्या या सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली.

कॉलेज रोड परिसरातील गुरुदक्षिणा सभागृहातील पलाश हॉलमध्ये 'पुढारी' मीडिया प्रा. लि.तर्फे आयोजित या सन्मान सोहळ्यासाठी मुख्य अतिथी म्हणून विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ उपस्थित होत्या. व्यासपीठावर व्ही. पी. सूर्या वूड स्टोव्हचे संचालक विजयसिंह युवराज पाटील, दैनिक 'पुढारी'चे निवासी संपादक डॉ. राहुल रनाळकर, युनिट हेड बाळासाहेब वाजे उपस्थित होते. सोहळ्यास व्हीव्हीडी ज्वेलर्सचे संचालक अभिजित दुसाने, अदिती दुसाने उपस्थित होते.

सन्मानार्थी मातृत्वाचा गौरव करताना प्रत्येक सन्मानामागे संघर्ष, जिद्द आणि कर्तृत्वाची प्रेरणादायी कहाणी कथन करण्यात आल्याने, सभागृहातील कडकडाटाने दुमदुमून गेले होते. सन्मानार्थी जेव्हा सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर जात असत, तेव्हा प्रत्येक मायेच्या पदरात संस्काराचे विश्व आणि त्यागाची अथांग शक्ती दडलेली असल्याची प्रचिती होत होती. आपल्या मातृत्वाचा सन्मान होत असल्याचे बघून उपस्थित कुटुंबीयांचे डोळेदेखील पाणावले होते. त्यामुळे अनेकांनी मायेच्या गौरवाचा क्षण सोबत साजरा करण्यासाठी सन्मान स्वीकारल्यामुळे सोहळा अधिकच अविस्मरणीय ठरला.

सुनेची सोहळ्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, स्त्रीच्या आयुष्यातील दुसरी आई म्हणजे सासूबाईचा सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरील उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली. सून आणि सासूमध्ये असलेले मायेचे नाते या सोहळ्याने अधोरेखित केले, तर आपल्या आईचा सन्मान होत असल्याचा क्षण धडपड उपस्थितांची मने जिंकून गेली.

मायेच्या अमूल्य ऋणाची परतफेड कधीच शक्य नसली, तरी कृतज्ञतेची फुले अर्पण करण्याचा दै. 'पुढारी'चा हा प्रयत्न होता, ही खरोखरच कौतुकास्पद असल्याच्या भावना पुरस्कारार्थी तसेच त्यांच्या आप्तेष्टांनी व्यक्त केल्या. सोहळ्याला व्हीव्हीडी ज्वेलर्स, अवंती पैठणी आणि व्ही. पी. सूर्या वूड स्टोव्ह यांचे सहकार्य लाभले. सोहळ्याचे सन्त्रसंचालन हर्षल कोठावदे यांनी केले.

आई ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याची पहिली गुरू असते. तिच्या त्यागामुळेच सक्षम कुटुंब, सक्षम समाज आणि सक्षम राष्ट्र घडते. अशा मातृशक्तीचा सन्मान म्हणजे समाजातील सकारात्मक मूल्यांचा गौरव आहे.

- आमदार चित्रा वाघ

लेकीने केला मातृत्वाचा सन्मान

लेकीने मातृत्वाचा सन्मान केल्याचे अनोखे दृश्य या सोहळ्याचे विशेष ठरले. आमदार चित्रा वाघ यांच्या मातोश्री लताताई वानखेडे या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होत्या. त्यांची लेक चित्रा वाघ यांच्या हस्ते पैठणी देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी लताताई यांनी लेकीला मिठी मारत कौतुक केले. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. हे दृश्य बघून उपस्थितदेखील भारावून गेले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news