नाशिक शहरात पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

नाशिक शहर पोलिस दलात नव्याने पोलिस निरीक्षक दाखल
Nashik police transfers
police transfersFile Photo
Published on
Updated on

नाशिक : शहर पोलिस दलात नव्याने पोलिस निरीक्षक दाखल झाले असून, नवीन जुन्यांची सांगड घालत पोलिस निरीक्षकांना जबाबदारी वाटण्यात आल्या आहेत. त्यानुसार पोलिस ठाणेनिहाय दुय्यम निरीक्षकांना नियुक्ती देण्यात आल्या असून, इतर विभागांमध्येही नियुक्ती केली आहेत.

Nashik police transfers
Nashik Police Transfers | 'प्रभारीं'ची होणार खांदेपालट

यांच्याकडे आला हा पदभार

अंबडचा तात्पुरता पदभार स्विकारणाऱ्या सुनील पवार यांना अंबडला वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदाचा पदभार सोपवण्यात आला आहे. तसेच उपनगरचे निरीक्षक जयंत शिरसाठ यांची व सातपूरचे विश्वास पाटील यांची अंबडला दुय्यम निरीक्षकपदी बदली केली आहे. तसेच सुभाष पवार यांची अभियोग कक्षात, नियंत्रण कक्षातील रामदास शेळके यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली केली आहे. तसेच नागपूरहून आलेले जगवेंद्रसिंग राजपुत यांची गंगापूरला दुय्यम निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागातून आलेले डाॅ. अंचल मुदगल यांची पीसीब-एमओबी शाखेच्या प्रभारी पदी निवड केली आहे. तर गुन्हे अन्वेषण विभागातून आलेले संजीव फुलपगारे यांची उपनगरला दुय्यम निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news