

सिडको (नाशिक) : अंबड केवल पार्क परिसरात अंघोळीचे गरम पाणी अंगावर पडून भाजून जखमी झालेला दीड वर्षाच्या बालकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अंबड लिंक रोड परिसरातील केवलपार्क परिसरात आयुष पावरा ( दीड वर्ष) हा २३ मे रोजी आंघोळीचे गरम पाणी अंगावर पडून ५० ते ६० टकके भाजून जखमी झाला होता. उपचारासाठी रुणालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना निधन झाले. या प्रकरणी अंबड पोलिस ठाणे येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलिस हवालदार टोपले करीत आहेत.