Eid-e-Milad News | नाशिकमध्ये ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत डीजेवर पूर्ण बंदी; मध्यवर्ती सीरत कमिटीचा मोठा निर्णय

Eid-e-Milad News | शाही मशिद येथे वाहनांची नोंदणी बंधनकारक; ईद-ए-मिलाद मिरवणुकीसाठी नवीन नियमावली जाहीर
Eid-e-Milad News | नाशिकमध्ये ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत डीजेवर पूर्ण बंदी; मध्यवर्ती सीरत कमिटीचा मोठा निर्णय
Published on
Updated on

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येत्या २६ ऑगस्टला देशभरात मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद सण साजरा होणार आहे. या निमित्ताने नाशिक शहरात ईदच्या दिवशी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत डीजे तसेच मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टिमच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय मध्यवर्ती सीरत कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

Eid-e-Milad News | नाशिकमध्ये ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत डीजेवर पूर्ण बंदी; मध्यवर्ती सीरत कमिटीचा मोठा निर्णय
Murder Mystery | हॉटेल मिरचीजवळील अपघात ठरला हत्याकांड; नाशिक पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा

शहर ए खतीब हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मिरवणूक शांततेत आणि धार्मिक वातावरणात पार पाडण्यासाठी विविध मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संस्था, मंडळ किंवा ग्रुपच्या वाहनावर संबंधित संस्थेचे नाव आणि नोंदणी क्रमांक लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे.

संस्थांची नोंदणी शाही मशिद येथे करण्यात येणार आहे. नोंदणी नसलेल्या वाहनांना पोलिसांकडून मिरवणुकीत सहभागी होण्यास नकार दिला जाऊ शकतो. मिरवणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर कृत्य, गैरप्रकार किंवा आक्षेपार्ह घोषणाबाजी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

Eid-e-Milad News | नाशिकमध्ये ईद-ए-मिलादच्या मिरवणुकीत डीजेवर पूर्ण बंदी; मध्यवर्ती सीरत कमिटीचा मोठा निर्णय
Earthquake in Nashik | नाशिक जिल्ह्यात पंधरवड्यात 29 भूकंपाचे धक्के; पेठ, सुरगाणा अन् दिंडोरी परिसर हादरला

तसेच डीजे वाजवण्यास पूर्णपणे बंदी करण्यात आली असून, साऊंड सिस्टिमचा वापर करताना इतर नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, अशाच मर्यादित आवाजात तो वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ईदच्या तयारीला वेग

यंदा २६ ऑगस्टला ईद-ए-मिलादुन्नबीचा सण साजरा करण्यात येणार असून, शहरातील विविध भागांत सणाच्या तयारीला वेग आला आहे. विविध मंडळांकडून आकर्षक देखावे तयार करण्यास सुरुवात झाली असून, मोहल्ल्यांमध्ये सजावटीचे कामही जोरात सुरू आहे. सर्व भाविकांनी मध्यवर्ती सीरत कमिटीने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने आणि धार्मिक वातावरणात ईद-ए-मिलादुन्नबीचा सण साजरा करावा, असे आवाहन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news