

Three girls molested by an old man
नाशिक : पुढारी वृत्तसेवा कुमारिका पूजनाचा प्रसाद देण्याचा बहाणा करून ७४ वर्षीय वृद्धाने तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची घटना नाशिकरोड येथे घडली.
तरणतलाव परिसरात राहणाऱ्या महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, फिर्यादीची मुलगी, पुतणी व मुलीची मैत्रीण या अल्पवयीन मुली नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कन्या पूजनाचा प्रसाद घेण्यासाठी गेल्या होत्या.
त्यावेळी फिर्यादीच्या बिल्डिंगच्या समोर असलेल्या अन्य बिल्डिंगमध्ये राहणारा संशयित आरोपी गोपाल निपाणे (७४) याने या तीनही अल्पवयीन मुलींना कन्यापूजनाचा प्रसाद देण्याच्या बहाण्याने घरात बोलावले. मात्र, या मुली घरात येण्यास नकार देत होत्या.
हे पाहून त्यांच्या हाताला पकडून बळजबरीने घरात ओढण्याचा प्रयत्न करून त्यांच्या स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.